Uncategorizedताज्या घडामोडीपुणे

Hinjawadi News: मित्राकडून मित्राचा खून, मृतदेह मोकळ्या जागेत फेकला

हडपसर येथे मित्राकडून मित्राचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. येथे मित्रारानेच हत्याराने कपाळावर, हातावर, छातीवर मारहाण करून एकाला गंभीर जखमी करून त्याचा खून केला. हा प्रकार मुळशी तालुक्यातील नेरेदत्तवाडी येथे गुरुवारी (दि. 31) उघडकीस आला.

गणेश रामदास पिंजण (वय 35, रा. कासारसाई, ता. मुळशी), असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत दिनेश रामदास पिंजण (वय 33, रा. नेरेदत्तवाडी, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नवनाथ शेडगे, ऋषिकेश भिंताडे (दोघे रा. कासारसाई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत गणेश आणि आरोपी शेडगे व भिंताडे हे मित्र होते. आरोपींनी गणेश यांना अज्ञात कारणावरून हत्याराने कपाळावर, हातावर व छातीवर मारहाण केली. त्यात गंभीर जखमी होऊन गणेश यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा मृतदेह नेरेदत्तवाडी येथील मोकळ्या प्लाॅटमध्ये फेकून दिला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button