breaking-newsताज्या घडामोडीपुणे

खेड्यातील युवकांना प्रशिक्षण देऊन उद्योजक बनवा :नवाब मलिक

तळेगाव– महात्मा गांधी यांच्या खेड्याकडे चला या घोषणेप्रमाणे खेड्यातील युवकांना वेगवेगळ्या उद्योगाचे प्रशिक्षण देऊन ग्रामोद्योग संघाने युवकांना उद्योजक बनवावे. अनुदानित कर्जपुरवठा करून त्यांना स्वयंपूर्ण बनवावे, असे प्रतिपादन राज्याचे अल्पसंख्याक व कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी केले.

मावळ तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघाच्या नविन कार्यालयाचे उदघाटन अल्प संख्याक व कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे,संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष नारायण ठाकर,राष्ट्रवादी अल्प संख्याक सेल अध्यक्ष आफताब शेख, पंचायत समिती सभापती ज्योती शिंदे, नगराध्यक्ष मयूर ढोरे,माजी उपनगराध्यक्ष चंद्रजित वाघमारे,नगरसेवक राजू कुडे माजी नगरसेवक बाबूलाल नालबंद,राष्ट्रवादी ओ बी सी चे अध्यक्ष अतुल राऊत,खरेदी विक्री संघाचे माजी उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, माजी उपरपंच विशाल वहिले,माजी सरपंच विठ्ठल मोहिते, सरपंच नामदेव शेलार,सोमनाथ धोंगडे, उद्योजक रोहीत गिरमे, संतोष कोंढरे,भाऊ मोरमारे,संचालक साहेबराव मोहिते,सोपान कदम,भावना ओव्हाळ, चंद्रकांत दहीभाते,नारायण भालेराव,आदी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की युवकांना वेगवेगळ्या उद्योगाचे प्रशिक्षण देऊन स्वयंपूर्ण बनवा व त्याना अनुदानित कर्ज पुरवठा करा मागासर्गीय व महिलांना 35 टक्के तर सर्वसाधारणसाठी 25 टक्के सबसिडीचा लाभ द्या. ग्रामीण भागातील लोकांना ग्रामोद्योग वसाहत स्थापन करा, त्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी असे सांगितले.

प्रास्ताविक चेअरमन अंकुश आंबेकर यांनी केले. व्हाईस चेअरमन गणेश भांगरे यांनी स्वागत केले तर आभार संचालक सुदेश गिरमे यांनी मानले.

पुणे जिल्हयातील मावळचा संघ हा एक नबंरवर असुन कर्ज वसुली शंभर टक्के आहे या संघाच्या कार्यिलयाला पंचायत समितीत हक्काची जागा जिल्हा परीषदेचे कृषि व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर यांनी मिळवुन दिली. खरं तर बाबुराव वायकर यांचे मावळ ग्रामोद्योग संघाच्या कार्यालया संदर्भात मोठं योगदान असल्याचे संघाचे चेअरमन अंकुश आंबेकर यांनी सांगितले

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button