breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
राज ठाकरे उद्धव यांच्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार?
मुंबई | महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणारे उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चुलत भाऊ राज ठाकरे हे मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. उद्धव हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांना संपूर्ण कुटुंबासमवेत येण्याचे आमंत्रण देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सकाळी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरेही होत्या. राज्यपाल कोश्यारी यांना पुष्पगुच्छ देऊन उद्धव आणि रश्मी ठाकरेंनी त्यांचं स्वागत केले. उद्धव ठाकरे उद्या मुख्यमंत्रिपदाची शिवतीर्थावर शपथ घेणार आहेत. ठाकरे घराण्यातील पहिला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच्या रुपाने महाराष्ट्राला मिळणार आहे.