breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

अॅमेझॉननंतर आता डॉमिनोज मनसेच्या रडारवर, कंपनीने घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई – मराठीच्या मुद्यावरून राज्यात अॅमेझॉन आणि मनसेमधील संघर्ष चांगलाच पेटला होता. मनसेकडून पुणे आणि मुंबईत अॅमेझॉनच्या कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर कंपनीने नरमाईची भूमिका घेत, वेबसाईटवर मराठी भाषेचा समावेश केला जाईल, असे आश्वासन दिले होते. आता अॅमेझॉननंतर मनसेने आपला मोर्चा डॉमिनोजकडे वळवला आहे.

डॉमिनोजच्या अॅप्लिकेशनवर मराठी भाषा उपलब्ध नसल्याने तसा पर्याय उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी आता मनसेने केली आहे.

मनसेच्या इशाऱ्यानंतर डोमिनोजने देखील सावध भूमिका घेत, अ‍ॅपमध्ये मराठी भाषा उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि डॉमिनोजला पत्र देणारे मनसे उपाध्यक्ष मुनाफ ठाकूर यांना पत्र देऊन आपण मराठीत अ‍ॅप्लिकेशन सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, याआधी मनसेने ‘मराठी नाही तर अॅमेझॉन नाही’ अशी भूमिका घेतली होती. मनसेच्या इशाऱ्यानंतर अ‍ॅमेझॉनने याविरोधात न्यायालयात धाव घेत राज ठाकरे यांना नोटीस पाठवल्यानंतर मनसेच प्रचंड आक्रमक झाली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button