breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

कोल्हापुरातील हिदुत्ववादी संघटना आक्रमक, संघटनेकडून कोल्हापूर बंदची हाक

कोल्हापूर : शिवराज्यभिषेक दिनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यात आल्यानंतर काल दुपारपासून कोल्हापूरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या आहेत. हिदुत्ववादी संघटनेने आज कोल्हापूर बंदची हाक दिली आहे.

आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या तरूणांना अटक करून गंभीर गुन्हे नोंदवण्यात यावे अशी मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मात्र त्याला कोल्हापूर पोलिसांनी विरोध करत तुम्हाला या ठिकाणी जितक्या वेळ आंदोलन कपरायचं ते करा, असे आवाहन करत रॅलीला परवानगी देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. मात्र, हिंदुत्ववादी संघटना आंदोलन करण्याची ठाम भूमिका घेतली आहे.

हेही वाचा – आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आजपासून, असा असणार भारतीय संघ

कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी चौकामध्ये प्रचंड मोठा जमाव जमला. या जमावाने दोषी तरुणांना अटक करण्याची मागणी केली. दरम्यान या जमावाने कोल्हापूर शहरात रॅली काढण्याचा निर्णय घेतला. त्याला पोलिसांनी आक्षेप घेतला आणि रॅलीला परवानगी दिली नाही. त्यातून वाद वाढत गेला. गंजी गल्लीत जमावाने दगडफेक केली.

मटण मार्केट परिसरातही काही ठिकाणी मोडतोड झाली. अखेर पोलिसांकडून जमावावर लाठीमार करण्यात आला. त्यामुळे महापालिका चौक परिसरामध्ये अत्यंत तणावाचे वातावरण आहे. येथे एका रिक्षाची मोडतोड करण्यात आली तर चप्पल लाईनला असलेल्या हॉलीवुड शूज या दुकानाची मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आली. चौकात चपलांचा अक्षरश: खच पडलेला आहे. महाद्वार रोड, ताराबाई रोड, छत्रपती शिवाजी रोड, राजारामपुरी या भागातील सर्व दुकानं शंभर टक्के बंद आहेत. संपूर्ण कोल्हापूर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणाखाली असली, तरी शहरात तणाव आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button