ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘‘शिवनेरी औषधी वाटिका ’’ चा शुभारंभ!

ब्रिगेडियर जेम्स थॉमस यांची उपस्थिती : माजी नगरसेविका आरती चौंधे यांचे सहकार्य

पिंपरी: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सिल्व्हर एज युटोपियन आणि औंध मिलिटरी स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींचा समावेश असलेले शिवनेरी औषधी वाटिका या उद्यानाचे उद्घाटन ब्रिगेडियर जेम्स थॉमस (कमांडर शिवनेरी ब्रिगेड) आणि डॉ.मेजर अनु श्रीवास्तव (चेअरमन शिवनेरी फॅमिली वेल्फेअर)यांच्या हस्ते करण्यात आले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त डॉक्टर अनु यांनी प्लास्टिकच्या दैनंदिन वाढत्या वापरामुळे कॅन्सर चे प्रमाण कसे सतत वाढते आहे याबद्दल आपले विचार मांडले,रोजच्या आपल्या जीवनशैलीत छोटे छोटे बदल करून आपण पर्यावरणावर तसेच मानवी आणि प्राणी जीवांवर होणाऱ्या प्रतिकूल परिणाम कसे थांबवू शकतो याबद्दल त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
मा.अनुष्का कजाबजे यांनी औषधी वनस्पतींचे आपल्या जीवनातील महत्त्व याबद्दल सर्वांना मार्गदर्शन केले.
प्राचीन काळापासून भारतात आयुर्वेदिक औषधे कशी वापरली जायची,त्याचे महत्त्व आता कसे कमी होत चालले आहे आणि आपल्या देशातून जडीबुटी घेऊन बाहेरच्या देशातील कंपन्या त्याचीच औषधे बनऊन आपल्यालाच कसे वाट्टेल त्या किमतीला विकतात याची जाणीव त्यांनी करून दिली.

सर्वांनी आपल्याकडे असलेल्या जागेत औषधी वनस्पतींची लागवड करावी आणि पूरक उत्पन्न वाढवावे, यासाठी लागणारी सर्व रोपे मिनिस्ट्री ऑफ आयुष,भारत सरकार मोफत उपलब्ध करून देईल असे त्यांनी आवर्जून सांगितले.

सिल्व्हर एज युटोपियन ही सामाजिक संस्था पर्यावरण क्षेत्रात जोमाने भरीव काम करीत असून ‘वर्ल्ड ग्रीन मिशन’ हा प्रोजेक्ट त्यांनी हाती घेतला आहे,जगातील अनेक देशांत काम पर्यावरण बचावासाठी काम करणारे ग्रीन पर्यावरण दूत त्यांनी नेमलेले आहेत.समाजातील सामाजिक क्षेत्रात काम करणारे हे दूत विविध पातळीवर आपल्या धरणीला हिरवा शालू नेसविण्यासाठी जोमाने प्रयत्न करीत आहेत,त्याचाच एक भाग म्हणून आजच्या शिवनेरी औषधी वाटिकेचे पायलट प्रोजेक्ट म्हणून उद्घाटन करण्यात आले. आजच्या या कार्यक्रमाला माजी नगरसेविका आरती चौंधे आवर्जून उपस्थित होत्या. ही रोपवाटिका तयार करताना त्यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
सिल्व्हर एज युटोपियन याच्या व्हॉईस प्रेसिडेंट ऐशवर्या वानखेडे यांच्या पुढाकारातून हा प्रोजेक्ट साकारण्यात येणार आहे. नाशिकमधील पाहिले आर्किटेक्ट सुधाकर के.शिऊरकर यांच्या स्मरणार्थ पिनल वानखडे यांनी प्रायोजित केला.

आजच्या कार्यक्रमाला सिल्व्हर एज युटोपियन च्या संस्थापकिय अध्यक्षा पिनल वानखडे,गिरीश वानखडे,सल्लागार संतोष होनकर्पे , डॉ.गौरी शिऊरकर, रोटरी प्रांतपाल 2023-24 रो.मंजू फडके,CA सुयोग बागुल,नितीन शिऊरकर,संकेत चौंधे, नयना चोपडे,पूजा गिरी,चंद्रशेखर महामुनी,मयूर पाटील,उत्तमराव मांढरे, आणि विवेक देशपांदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. गायक चंद्रशेखर महामुनी यांनी आपल्या भारतीय सेने साठी उत्तम गीत गायले,सूत्रसंचालन पूजा गिरी यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button