Uncategorizedताज्या घडामोडीमराठवाडा

जीएसटी वाढला अन् चोरट्यांनी डाव साधला; जालन्यातील प्रकार पाहून तुम्हीही डोक्याला हात माराल

जालनाः बिगरब्रँडेड पॅकबंद खाद्यपदार्थांवर अखेर सोमवारपासून पाच टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाला आहे. जीएसटी लागू झाल्यामुळं सर्वसामान्यांच्या खिशावर आर्थिक भुर्दंड पडला आहे. किराणा सामानाचे भाव वाढणार या भीतीने चोरट्यांनी किराणा दुकानात चोरी केली आहे, साखर, चहा पावडर, साबुदाणा, डाळसह किराणा दुकानातून पाच लाखांचा माल चोरट्यांनी लंपास केला आहे. जीएसटी वाढल्यामुळं चोरट्यांनी ही शक्कल लढवल्याची चर्चा परिसरात पसरली आहे.

जालना जिल्ह्याच्या परतूर शहरातील मोंढा भागातील विजय किराणा दुकान चोरट्यांनी फोडून दुकानातील नगदी २३ हजार ७७५ रुपये व किराणा सामान असा एकूण पाच लाख आठ हजार १३७ रुपये किमतीचे मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना काल सोमवारी सकाळी नऊ वाजता उघडकीस आली आहे. दुकानदार गणेश राजबिंडे (रा. श्रीधर जवळा) शनिवारी रात्री दुकान बंद करून घरी गेले. रविवारी संपूर्ण दिवस दुकान बंद होते.

सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास दुकान उघडले असता दुकानातील सामान अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेले दिसले. पाहणी केली असता दुकानातील नगदी २३ हजार ७७५ रुपये व साखर, चहापत्ती, तेल, शेंगदाणे, साबुदाणा, डाळ यांसह आदी किराणा सामान असा एकूण पाच लाख आठ हजार १३७ रुपये किमतीचा किराणा माल चोरट्यांनी चोरला होता.

चोर दुकान बंद असताना दुकानाच्या मागील बाजूस दुकान फोडले. त्यानंतर दुकानात शिरुन पाच लाखांचा माल लंपास केला. याप्रकरणी परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुकताच जीएसटीत वाढ होणार असल्याने मोंढ्यातील व्यापाऱ्यांनी एकदिवसीय बंद पुकारला होता. त्यामुळे भाव वाढीच्या धाकाने तर चोरट्यांनी किराणा दुकान साफ केले की काय अशी चर्चा रंगली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button