आरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
जलतरण स्पर्धेची तयारी करणाऱ्या खेळाडूंसाठी जलतरण तलाव सुरू
पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील जलतरण तलाव जलतरण स्पर्धेची तयारी करणाऱ्या खेळाडूंच्या सरावासाठी आजपासून सुरू करण्यात आली आहेत. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी काढले आहेत.कोरोनामुळे जलतरण तलाव बंद होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. जलतरण स्पर्धेची तयारी करणाऱ्या खेळाडूंच्या सरावासाठी आजपासून तलाव सुरू करण्यात आले आहेत. जलतरण प्रशिक्षकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे दोनही डोस पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. इतर बाबीसाठी 14 ऑगस्टचे आदेश कायम राहणार आहेत.





