Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी

जेवणानंतर थोडी बडीशेप खाल्ल्याने शरीरात किती बदल होऊ शततात, तुम्हाला माहितीये?

Health : बडीशेप अनेकांना आवडते, पण त्याने नेमके काय फायदे आहेत, हे फार कोणाला माहिती देखील नसतील. अनेकांना जेवण झाल्यानंतर बडीशेप खाण्याची सवय असते आणि ही सवय खरंच चांगली सवय आहे… बडीशेप हा एक मसाला आहे, जो सर्वांच्या स्वयंपाक घरात असतोच. अनेक जण बडीशेपचा स्वयंपाकासाठी देखील वापर करतात. कारण त्यामुळे चव वाढते. बडीशेप फक्त केवळ तोंडाला चव आणणारी गोष्ट नाही, तर तिचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. विशेषतः जेवणानंतर थोडी बडीशेप चावून खाण्याच्या सवयीमुळे पचनक्रिया सुधारण्यास आणि शरीराचे संपूर्ण आरोग्य राखण्यास मदत होते. एक छोटीशी सवय आरोग्यसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे जाणून घ्या बडीशेप का खाल्ली पाहिजे.

बडीशेप खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. बडीशेप पाचक रस आणि एन्झाइम्सच्या निर्मितीला चालना देते. यामुळे अपचन, पोट फुगणे, जठराचा त्रास आणि बद्धकोष्ठतेच्या समस्या कमी होण्यास मदत होते. जेवणानंतर थोडी बडीशेप खाणे पचनासाठी चांगले असते.

बडीशेप खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते. बडीशेपमधील नैसर्गिक सुगंधी तेल आणि जिवाणूनाशक गुणधर्म तोंडाची दुर्गंधी कमी करतात. त्यामुळे, जेवणानंतर बडीशेपचे सेवन केल्याने श्वास ताजा राहतो आणि त्यामुळे तोंडाला दुर्गंधी येते.

हेही वाचा –  १०० कोटींची कमाई करणारा समांथा रुथ प्रभूचा ‘मा इंटी बंगारम’ ओटीटीवर होणार रिलीज, कुठे पाहायचा? वाचा…

बडीशेप डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. बडीशेपमध्ये व्हिटॅमिन ए आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे डोळ्यांचे आरोग्य राखण्यास मदत करतात. त्याच्या नियमित सेवनाने दृष्टीच्या आरोग्याला फायदा होऊ शकतो.

बडीशेपमुळे त्वचेची चमक वाढवते. बडीशेपमधील अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकलमुळे होणारे नुकसान टाळण्यास मदत करतात, ज्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते आणि अकाली वृद्धत्वाची चिन्हे कमी होण्यास मदत होते.

बडीशेप वजन नियंत्रणात मदत करते. बडीशेप भूक नियंत्रित ठेवण्यास मदत करते. ती चावल्याने पोट भरल्यासारखे वाटते आणि मधूनमधून काहीतरी खाण्याची इच्छा कमी होते. बडीशेपमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, जे रक्तदाब संतुलित ठेवण्यास आणि हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत करते. एवढंच नाही तर, बडीशेपमधील पोषक तत्वे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास आणि चयापचय क्रिया वाढवण्यास मदत करतात, ज्यामुळे शरीर सक्रिय राहते. पण जर तुम्हाला काही आरोग्य समस्या असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम राहील.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button