TOP News । महत्त्वाची बातमीBreaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दुष्काळग्रस्त अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणार एक लाख रिक्षा; प्रताप सरनाईक यांची घोषणा

दरवर्षी २० हजार रिक्षांचे वाटप; ९० टक्के कर्ज आणि १० टक्के अनुदान, आरटीओ शुल्कही माफ करण्याचा प्रस्ताव

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी सरकारकडून एक लाख रिक्षांचे वाटप करण्याची योजना आखण्यात येत आहे. ‘अनाथांचा नाथ दुष्काळग्रस्त रिक्षा सन्मान योजना’ या नावाने ही योजना राबविण्याचा विचार असून, दरवर्षी २० हजार रिक्षांचे वाटप केले जाणार आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली.

या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना रिक्षा खरेदीसाठी ९० टक्के कर्ज आणि १० टक्के अनुदान देण्याचे नियोजन आहे. तसेच, रिक्षाधारकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) शुल्क माफ करण्याचाही प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

लॉटरी पद्धतीने होणार लाभार्थ्यांची निवड

राज्यातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश केला जाणार आहे. पात्र शेतकऱ्यांकडून अर्ज मागविल्यानंतर म्हाडाच्या घरवाटपाप्रमाणे लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्याचे नियोजन आहे. या योजनेची सुरुवात ९ फेब्रुवारीपासून करण्याचा मानस असल्याचेही सरनाईक यांनी सांगितले. या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे.

हेही वाचा –  पिंपरी-चिंचवडमध्ये पहिली संविधान सन्मान दौड उत्साहात

रिक्षा त्याच जिल्ह्यात वापरण्याची अट

या योजनेतून मिळालेली रिक्षा संबंधित शेतकऱ्याला त्याच जिल्ह्यात वापरता येणार आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना पर्यायी रोजगार आणि उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना आखण्यात आली आहे. मात्र, योजनेच्या अंमलबजावणीसाठी मंत्रिमंडळाची मंजुरी आणि अंतिम नियमावली निश्चित होणे आवश्यक आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group