Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: देशात ७४ दिवसांत सर्वात कमी रुग्ण
नवी दिल्ली |
देशात एका दिवसात आणखी ६० हजार ७५३ जणांना करोनाची लागण झाल्याने बाधितांची एकूण संख्या दोन कोटी ९८ लाख २३ हजार ५४६ वर पोहोचली आहे. तर उपचाराधीन रुग्णांची संख्या सात लाख ६० हजार ०१९ इतकी असून हा ७४ दिवसांतील नीचांक आहे, असे शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले. करोनामुळे आणखी १६४७ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या तीन लाख ८५ हजार १३७ वर पोहोचली असून उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण एकूण बाधितांच्या २.५५ टक्के इतके आहे.





