Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
पुण्यात कोरोनाचा पहिला बळी, 52 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू

पुण्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. कोरोनाबाधित 52 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या रुग्णावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील कोरोनाचा हा पहिला बळी ठरला आहे, तर महाराष्ट्रातील कोरोनाबळींची संख्या 9 वर पोहोचली आहे.
पुण्यात आज मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णाला विविध व्याधी होत्या. त्यामध्ये त्यांना कोरोनाचीही लागण झाली होती. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यात पहिला बळी गेल्याने पुणेकरांसाठी ही अत्यंत चिंतेची बाब आहे. पुण्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
पुण्यात आतापर्यंत 31 कोरोनाचे रुग्ण होते, त्यातील 7 जणांवर उपचार करुन घरी सोडण्यात आलं तर आज एकाचा मृत्यू झाला.





