पिंपरी / चिंचवड

दिघीतून ट्रॅक्टर तर चाकण मधून कार चोरीला

पिंपरी l प्रतिनिधी

दिघी आणि चाकण परिसरात वाहनचोरीचे दोन प्रकार उघडकीस आले आहेत. दिघी येथे घरासमोर पार्क केलेला ट्रॅक्टर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. तर चाकण येथे कारच्या शोरूम मधून एक कार चोरीला गेली आहे. याप्रकरणी शनिवारी (दि. 28) दिघी आणि चाकण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राजेंद्र पांडुरंग ढवळे (वय 42, रा. दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी त्यांच्या घराशेजारी असलेल्या मोकळ्या मैदानात त्यांचा दीड लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर आणि 25 हजारांची एक ट्रॉली पार्क केली होती. 14 मे रोजी मध्यरात्री एक ते सकाळी आठ वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्याने ट्रॅक्टर आणि ट्रॉली चोरून नेली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

भिमाशंकर महादेव इंगळे (वय 30, रा. चिखली) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे आळंदी फाटा चाकण येथील मायकार शोरूम मध्ये काम करतात. त्यांच्या ग्राहकाने त्याची कार शोरूममध्ये कामासाठी आणली होती. 19 मे रोजी सकाळी अकरा ते 22 मे रोजी दुपारी तीन वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने पाच लाख 93 हजार 200 रुपये किमतीची कार चोरून नेली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button