breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पाणी समजून नगरसेवकाच्या सहका-याने पिले अॅसिड, क्रिडा सभापती उत्तम केंदळेंच्या दालनातील प्रकार

पिंपरी / महाईन्यूज

क्रिडा समिती सभापतींच्या दालनामध्ये प्लास्टिक बाटलीत ठेवलेले अॅसिड पाणी समजून प्राशन केल्यामुळे नगरसेवकाच्या सहका-याची प्रकृती बिघाडली. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. अॅसिडची बाटली ठेवणा-या सफाई कंत्राटी कामगारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी क्रिडा सभापती उत्तम केंदळे यांनी केली आहे.

यासंदर्भात आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात केंदळे यांनी म्हटले आहे की, महापालिकेतील क्रीडा सभापती केबिन येथील मिटिंग रूममध्ये सफाई कार्माचा-याकडून निष्काळजीपणे पाण्याच्या बाटलीमध्ये अॅसिड ठेवले होते. ते अॅसिड नगरसेवक राजू बनसोडे यांच्या सहका-याने बाटलीतील अॅसिड पाणी समजून प्राशन केले. त्यांची प्रक्रती बिघाडल्याने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले.

निष्काळजीपणा करणा-या सफाई कंत्राटदार व त्यांच्या कर्मचाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी. या सर्व घटनेस क्रीडा सभापती प्रत्यक्षदर्शी असून क्रीडा सभापती उत्तम केंदळे व नगरसेवक राजू बनसोडे यांनी सफाई कंत्राटदार तावरे फॅसीलीटी या संस्थेला काळ्या यादीत टाकावे, त्यांचे महापालिका सफाई कंत्राट काढण्यात यावे. त्यांच्यवर कायदेशीर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केंदळे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button