breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘Hats Of शरद पवार’! पंकजा मुंडे यांच्या ट्विटमुळे चर्चेला उधाण

मुंबई : कोरोनाच्या परिस्थितीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार सातत्याने राज्यात दौरा करत आहेत. कोरोना काळ आणि परतीच्या पावसात शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पुढाकार घेत आहेत. त्यांच्या या कामाबाबत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे कौतुक केले होते. तसेच त्यांना Hats Off केले आहे. याबाबत आमदार  रोहित पवारांनी त्यांचे आभार मानले आहेत.

Hats Off इतका दौरा,  आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले. पक्ष, विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तर कष्ट करणाऱ्या विषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबानी शिकवले आहे, असे म्हणत शरद पवार यांचे कौतुक केले होते. मंगळवारी पुण्यात  राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पंकजा  मुंडेही उपस्थित होत्या. ऊसतोड कामगारांचा प्रश्न सुटल्यानंतर समाधानही त्यांनी व्यक्त केले होते. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी ट्विट करत शरद पवारांना सलाम केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button