Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी
WPL 2024 | महिला प्रीमियर लीगचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी होणार सुरूवात

Women’s Premier League 2024 | महिला प्रीमियर लीगचं संपूर्ण वेळापत्रक अखेर जाहीर झालं आहे. बंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा पहिला सामना आयोजित करण्यात आला आहे. २३ फेब्रुवारीला पहिला सामना होणार आहे तर १७ मार्च रोजी दिल्लीमध्ये अंतिम सामना खेळवला जाणार आहे.
यंदा महिला प्रीमियर लीगमध्ये एकूण २२ सामने होणार आहेत. अंतिम सामना १७ मार्च रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. हे सर्व सामने सायंकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहेत. १५ मार्च रोजी एलिमिनेटर सामना खेळला जाईल.
महिला प्रीमियर लीगचं संपूर्ण वेळापत्रक :
- २३ फेब्रुवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
- २४ फेब्रुवारी – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध यूपी वॉरियर्स
- २५ फेब्रुवारी – गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
- २६ फेब्रुवारी – यूपी वॉरियर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
- २७ फेब्रुवारी – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात जायंट्स
हेही वाचा – ‘..तर भाजपमुक्त प्रभू श्री राम करू’; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
- २८ फेब्रुवारी – मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स
- २९ फेब्रुवारी – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
- १ मार्च – यूपी वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्स
- २ मार्च – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स
- ३ मार्च – गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
- ४ मार्च – यूपी वॉरियर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
- ५ मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
- ६ मार्च – गुजरात जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
- ७ मार्च – यूपी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
- ८ मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध यूपी वॉरियर्स
- ९ मार्च – मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स
- १० मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
- ११ मार्च – गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी वॉरियर्स
- १२ मार्च – मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
- १३ मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स
- १५ मार्च – एलिमिनेटर मॅच
- १७ मार्च – अंतिम सामना.





