breaking-newsराष्ट्रिय

‘आप’चे ९ आमदार संपर्कात; काँग्रेसचा दावा

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आम आदमी पक्षाशी आघाडीस नकार दिल्यावर राजधानीतील राजकीय हालचाली वाढल्या आहेत. दिल्लीतील सत्ताधारी आपचे नऊ आमदार संपर्कात असल्याचा दावा काँग्रेस प्रवक्ते जितेंद्र कोचर यांनी केला आहे. या नऊ आमदारांनी काँग्रेस प्रवेशाची इच्छा व्यक्त केल्याचे कोचर यांनी सांगितले. विशेष म्हणजे माजी मंत्री आपने निलंबित केलेले संदीप कुमार यांनी दिल्ली काँग्रेस समितीच्या कार्यालयाला भेट दिली. मात्र काँग्रेसमध्ये प्रवेशाचा प्रश्न नसल्याचा दावा त्यांनी केला. काँग्रेसने आपशी युतीची शक्यता फेटाळल्याने पक्षात खळबळ असल्याचे त्यांनी सांगितले. या दाव्यावर भाष्य करण्यास आम आदमी पक्षाने नकार दिला आहे. मंगळवारी आपने काँग्रेसवर भाजपशी छुपा समझोता केल्याचा आरोप केला होता. तसेच आमचा पक्ष निवडणूकीस सज्ज असल्याचे स्पष्ट केले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button