breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘मनोज जरांगे पाटलांनी राजकीय पक्ष काढावा’; गुणरत्न सदावर्ते

मुंबई : मराठा आरक्षणसंदर्भात क्युरेटिव्ह पिटीशनवर आज सुप्रिम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं आहे. यावरून वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

गुणरत्न सदावर्ते म्हणाले, मनोज जरांगे पाटलांनी राजकारण करावं, याची कुणालाही हरकत नाही. आता तर त्यांनी पक्षाची घोषणाही करून टाकावी, परंतु इतरांना कलंकित, लायकीचे नाहीत, बघून घेऊ, अशी भाषा महाराष्ट्रात चालु दिल्या नाही पाहिजेत.

हेही वाचा  –  महापरिनिर्वाण दिन : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलच्या १० गोष्टी जाणून घ्या.. 

क्युरेटिव्ह पिटीशनमधून मराठा समाजाला काही नव्याने काही मिळणार नाही. मराठा समाजाला मागास ठरवण्याच्या भानगडीत पडाल तर काहीच मिळणार नाही. यातच तुम्हाला डंके की चोट पर सांगतो की, राज्यशासनाला कुणबी प्रमाणपत्रामध्ये कायदा करता येणार नाही, असंही गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

दरम्यान, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या दालनात ही सुनावणी होत असून या सुनावणीत युक्तिवाद होणार आहे. ३ न्यायमूर्ती आणि सरन्यायाधीश उपस्थित राहणार असून दालनात आज केस पुढे चालवायची की नाही, याचा निर्णय होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button