TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

राजकीय मानसिकतेतून एकनाथ शिंंदेनी बाहेर यावे, अजित पवार यांचा सल्ला

नागपूरः महाराष्ट्रातील अधिवेशनात एखादं दुसरा चिमटा सोडला तर कधीही कोणत्याही राजकीय नेत्याने राजकीय भाषण केलं नाही. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केलेलं भाषण पूर्णपणे राजकीय होतं. तुम्ही सहा महिन्यांपूर्वी काय केलं? यातून आता बाहेर पडलं पाहिजे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून आतापर्यंत झालेल्या सर्व मुख्यमंत्र्यांनी ही संस्कृती जपली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मानसिकतेतून बाहेर पडलं पाहिजे, असा सल्लाही अजित पवार यांनी दिला. महापुरुषांच्या अवमानाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकही शब्द काढला नाही. यावेळी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरुन अजित पवार यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली. आपण छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख स्वराज्य रक्षक असा करतो. मात्र, त्यांना काही लोक धर्मवीर म्हणत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांनी कधीही धर्मावरुन राज्य केलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचही हिंदवी स्वराज्य होतं.

विधीमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी देखील सभागृहात आरोपप्रत्यारोप पाहायला मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर झालेल्या सत्ताबदलानंतर हे पहिलेच हिवाळी अधिवेशन होते. शेवटच्या दिवशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाने केलेल्या प्रत्येक आरोपाचा समाचार घेतला. यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर भाष्य केलं. तुम्ही जे बाहेर केलं ते आता विसरून जा, मुख्यमंत्र्यांचं भाषण पूर्णपणे राजकीय होतं, अशी टिप्पणी अजित पवार यांनी केली. यावेळी महापुरुषांच्या अवमानाविरोधातही अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

महापुरुषांच्या प्रश्नाला बगल दिली : अजित पवार
सीमा प्रश्नावर एकमताने ठराव केला. बेळगाव, निपाणी गावांचा समावेश आम्ही करून घेतला. हरीश साळवे यांना यासाठी वकील म्हणून नियुक्त करण्याची मागणी केली. चहा पानाचा विरोध करताना आम्ही जे पत्र दिले त्यात काही विषय दिले होते. अवकाळी पावसाने झालेले नुकसान, धानाला बोनस या मागणी होत्या. विदर्भ मराठवाड्यातील प्रश्न आम्ही मांडले त्यातील सगळ्यांना समाधानकारक उत्तर मिळालं नाही. महापुरुषांचा अपमान होणार नाही यासाठी मंत्र्यांची हकालपट्टी करा, राज्यपाल हटवा या मुद्द्यांवर न बोलता दुसरे विषय आणून या प्रश्नाला बगल दिली. एकनाथ शिंदे शिवसेना फोडून बाहेर आले, याच्याबाहेर शिंदे अद्याप आले नाही. जे व्यक्ती सभागृहात नाही त्यावर ते सभागृहात आपल मत व्यक्त करतात. आमचं समाधान झालं नाही.

तर हे जेलमध्ये जातील का? : अजित पवार
सभागृहात मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे दिले. कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण केले. काही आमदारांना वाय प्लस सुरक्षा दिली. यावर एका आमदारावर 20 लाख खर्च येतो. ज्याला आवश्यकता त्याला सुरक्षा दिली पाहिजे. पण जे त्यांच्या बाजूचे आहे त्यांना सुरक्षा दिली, विरोधातील आमदारांची सुरक्षा काढली. देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाईची तयारी होती, असं मुख्यमंत्री म्हणाले. पण मला असं वाटत नाही. अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये घेतल्याचे आरोप होते, उद्या यांच्यावर पोलीस कर्मचाऱ्याने 200 कोटी रुपये घेतल्याचे आरोप केले तर हे जेलमध्ये जातील का? एखाद्या व्यक्तीचे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. एकनाथ शिंदे 13 कोटी जनतेचे मुख्यमंत्री आहे. त्यांनी चांगलं काम करून जनतेची सेवा करावी. आठवडाभर अधिवेशन वाढवा ही आमची मागणी सत्ताधाऱ्यांनी मान्य केली नाही,

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button