breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

महापरिनिर्वाण दिन : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलच्या १० गोष्टी जाणून घ्या..

Mahaparinirvana Day : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले. बाबासाहेबांची पुण्यतिथी देशभरात ‘महापरिनिर्वाण दिन’ म्हणून साजरी केली जाते. आंबेडकरांची पुण्यतिथी म्हणजेच, महापरिनिर्वाण दिन या दिवशी लोक त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतात. दिवे आणि मेणबत्त्या पेटवून त्यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करतात. त्यांच्या स्मरणार्थ अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यांचे विचार आणि त्यांची संघर्षगाथाही सांगितली जाते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलच्या १० महत्वाच्या गोष्टी

1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. ते त्याच्या पालकांचे १४ वे आणि शेवटचे अपत्य होते.

2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव आंबवडेकर होते. पण त्यांचे गुरू आणि शिक्षकांनी प्रेमाने त्यांचे आडनाव बदलून ‘आंबेडकर’ ठेवले.

3. वयाच्या १५ व्या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह नऊ वर्षांच्या रमाबाईशी झाला.

हेही वाचा  –  ‘आरोग्यखात्यात पदांचा लिलाव, बदल्यांसाठी ५० लाखांची मागणी’; संजय राऊतांचा गंभीर आरोप 

4. आंबेडकर मॅट्रिक पास होणारे पहिले दलित होते. त्याचबरोबर परदेशात अर्थशास्त्रात डॉक्टरेट करणारे ते पहिले भारतीय होते.

5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयात दोन वर्षे प्राचार्यपदही भूषवले.

6. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, स्त्रिया, मजूर यांच्यावरील सामाजिक भेदभावाविरुद्ध आवाज उठविला.

7. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १९४७ मध्ये पहिले कायदा व न्याय मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली.

8. १९४२ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या भारतीय कामगार परिषदेच्या ७ व्या सत्रात आंबेडकरांनी भारतातील कामाचे तास १४ तासांवरून ८ तास केले.

9. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३५-३६ मध्ये ‘वेटिंग फॉर अ व्हिसाचे’ नावाचे २० पानांचे आत्मचरित्र लिहिले. हे पुस्तक कोलंबिया विद्यापीठाने पाठ्यपुस्तक म्हणून वापरले आहे.

10. आपल्या मृत्यूच्या तीन दिवस आधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हे हस्तलिखित पूर्ण केले. ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे दिल्लीतील राहत्या घरी निधन झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button