breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नगरसेवक वसंत बोराटे यांच्या प्रयत्नातून नागरिकांची कोविड-19 चाचणी

मोशी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. करोनाच्या वाढत्या रूग्ण संख्येमुळे नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे नगरसेवक वसंत बोराटे यांनी आमदार महेश लांडगे यांच्या सहकार्यातून मोशी परिसरात नागरिकांसाठी कोविड-19 चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत चाचणी करून घेतली.

मोशी येथील प्रभाग क्रमांक दोनचे नगरसेवक वसंत बोराटे यांच्या प्रयत्नातून कोविड-19 तपासणी कऱण्यात आली. प्रभागातील नागरिकांनी कोविड-19 तपासणी सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात केली होती. मोशी परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये करोनाचे रूग्ण सापडत आहेत. रूग्ण सापडल्यानंतर नगरसेवक वसंत बोराटे आणि त्यांचे सहकारी त्या सोसायटीमधील नागरिकांची तपासणी आणि जनजागृतीसाठी प्रयत्न करतात. नागरिकांनी सर्वांचीच कोविड-19 चाचणी करावी अशी मागणी केली होती. त्यानुसार आमदार महेश लांडगे यांच्या सहकार्यातून नगरसेवक वसंत बोराटे यांनी हे शिबिर घेतले.

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि रूबी केअरच्या सहकार्याने ही तपासणी करून घेतली. या तपासणी शिबिरासाठी डॉ.भावसार आणि त्यांच्या टीमचे सहकार्य लाभले. खासगी लॅबमध्ये या चाचणीसाठी 4 हजार 500 रूपये घेतले जातात. गोरगरीबांच्या खिशाला न परवडणारे हे शुल्क असल्यामुळे अनेक नागरिक लक्षण असूनही तपासणी करून घेत नाहीत. त्यामुळे प्रभागातील रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. दहा दिवसांच्या य़ा लॉकडाऊनमध्ये प्रभागातील नागरिकांची तपासणी करून उपचार करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे नगरसेवक वसंत बोराटे यांनी सांगितले.

नगरसेवक बोराटे म्हणाले, अनेक केसेसमध्ये कोरोनाची लक्षणेही आढळून आलेली नाहीत. त्यामुळे नागरिकांची कोविड – 19 चाचणी करणे अत्यंत आवश्यक होते. नागरिकांच्या मागणीनंतर आमदार महेश लांडगे यांच्याशी चर्चा करून त्यांच्या सहकार्याने हे चाचणी शिबिर घेतले आहे.माझा प्रभाग माझी जबाबदारी या संकल्पनेतून नगरसेवक बोराटे यांचे प्रभागातील नागरिकांसाठी कार्य सुरु आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button