breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

लालूंना मोठा दिलासा… भ्रष्टाचाराचा पुरावाच न सापडल्याने CBI ने अखेर तपास थांबवला

नवी दिल्ली |

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे लालू प्रसाद यादव यांच्या विरोधातल्या भ्रष्टाचार प्रकरणाचा प्राथमिक तपास सीबीआयने थांबवला आहे. कोणताही ठोस पुरावा न मिळाल्याने २०१८ पासून सुरु असलेला हा तपास थांबवण्यात आला. लालू प्रसाद यांचा मुलगा तेजस्वी आणि मुली चंदा आणि रागिणी यांच्यावर २०११ मध्ये चार लाख रुपयांमध्ये एबी एक्स्पोर्ट्स ही कंपनी खरेदी केल्याचा आरोप होता. या एबी एक्स्पोर्ट्सने दिल्लीतल्या न्यू फ्रेंड्स कॉलनीमध्ये पाट कोटी रुपयांची प्रॉपर्टी खरेदी केली होती. कोट्यावधी रुपयांची कंपनी लालू यांना केवळ चार लाख रुपयांना मिळाली होती. यानंतर हा पैसा एबी एकस्पर्ट्सने डीएलएफच्या माध्यमातून नवी दिल्ली रेल्वे स्टेशन आणि बांद्रा स्टेशन अशा प्रकल्पांकरता लाच म्हणून देण्यात आली.

काही दिवसांपूर्वीच रांची कारागृहातून त्यांची जामिनावर मुक्तता झाली होती. झारखंड उच्च न्यायालयाने त्यांना जामिन मंजूर केला. १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहेत. त्यासोबत त्यांना १० लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर काही शर्थी अटी ठेवण्यात आल्या आहेत. मंजुरीविना त्यांना देशबाहेर जाता येणार नाही. तसेच आपल्या घरचा पत्ता आणि मोबाईल नंबर बदलण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यांना चारा घोटाळ्याच्या प्रकरणात कारागृहात ठेवण्यात आलं होतं. तीन वर्षांहून अधिक काळ कारागृहात राहिल्यानंतर लालू प्रसाद यांनी राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकर्त्यांशी ऑनलाईन माध्यमातून संवाद साधला. त्यांच्या तब्येतीमुळे ते काही काळ दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात उपचार घेत होते. तिथून बाहेर पडल्यानंतर ते आपली मुलगी मीसा भारती यांच्या घरी राहत आहेत.

वाचा- आमदार सुवेंदू अधिकारींचे वडील व भाजपा खासदार सिसिर अधिकारी यांना केंद्राकडून Y+ सुरक्षा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button