breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील 13 आंतरराष्ट्रीय ओजस शाळांना मान्यता

  • जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण 

मुंबई – राज्यातील विद्यार्थ्यांना एकविसाव्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे दर्जेदार शिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभाग, शालेय शिक्षण विभाग यांच्या शाळांमधून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा निर्माण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

जून 2018 या नव्या शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षण विभागाच्या वतीने सरकारी शाळातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यासाठी “ओजस आंतरराष्ट्रीय शाळांची’ सुरुवात करण्यात येणार आहे. जून महिन्यापासून राज्यातील 13, तर पुढील शैक्षणिक वर्षापासून 100 आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या शाळा सुरु करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षणात अग्रेसर असणाछया सिंगापूर, हॉंगकॉंग, जपान या देशातील शिक्षण पद्धतींचा अभ्यास करून आणि समृद्ध आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम व प्रभावी अध्ययन संसाधने यांची उपलब्धता करण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यातील “13 ओजस’ शाळांची निवड झालेली असून या शाळा मार्गदर्शक म्हणून काम करण्यासाठी तयार होतील. या शाळांमधील शिक्षकांना पहिल्या टप्प्यात शासनाकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे.

या शाळांच्या अभ्यासक्रमासाठी “स्वतंत्र व स्वायत्त महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ’ तयार केले आहे. ज्ञानाधिष्ठित, समाजाभिमुख, एकविसाव्या शतकाकरिता कौशल्ये यांना केंद्रस्थानी ठेवून अभ्यासक्रम निर्मिती केली आहे. आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या शाळांसाठी एक समिती गठित करण्यात आली असून या समितीची पहिली बैठक नुकतीच पार पडली आहे.

एनसीईआरटी आणि एससीईआरटीच्या अभ्यासक्रमाचा विचार करुन अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम प्रामुख्याने ज्ञान, अभिवृत्ती, उपयोजना, कौशल्य आणि सवयी या 5 प्रमुख आधारस्तंभावर आधारित असणार आहे. या अभ्यासक्रमात साक्षरता, वाचन, लेखन, संभाषण, श्रवण, गणन, वित्त, कला, शारीरिक शिक्षण आणि पर्यावरणशास्त्र या विषयांचा समावेश प्रस्तावित आहे.

येत्या जून महिन्यापासून सुरु होणाऱ्या 13 शाळांसाठी 70 शिक्षकांची निवड करण्यात आली असून त्यांना सलग 22 दिवसांचे दर्जेदार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे निवडण्यात आलेल्या 13 शाळा या जिल्हा परिषदेच्याच मराठी माध्यमांच्या शाळा असून मराठीबरोबरच इंग्रजी आणि अन्य विषयांचे प्रभुत्व वाढविण्यावर या शाळांमध्ये भर देण्यात येणार आहे.

या शाळांना मिळाली मान्यता… 
पुणे विभाग 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाबळेवाडी, ता. शिरूर, जि. पुणे.
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, बोपर्डी, ता. वाई, जि. सातारा.
विद्या मंदिर, खानापूर, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर.

अमरावती विभाग 
जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा, वरखेड, ता. चिखली, जि. बुलढाणा.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, साखरा, जि. वाशिम.

औरंगाबाद विभाग 
जिल्हा परिषद प्रशाळा, शिराढोण, ता. कळंब, जि. उस्मानाबाद.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, माळीवाडा, ता. पाथरी, जि. परभणी.

कोकण विभाग 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खरेदी नं. 1, ता. शहापूर, जि. ठाणे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चराठे नं. 1, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.

नागपूर विभाग 
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, चिंचाळा, ता. चंद्रपूर, जि. चंद्रपूर.
शहीद जानया तिमया जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, गोरेगाव, जि. गोंदिया

नाशिक विभाग 
आंतरराष्ट्रीय निवासी शाळा, तोरणमाळ, ता. धडगाव, जि. नंदुरबार.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भोयेगाव, ता. चांदवाड, जि. नाशिक.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button