breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

अखेर बहुचर्चित T-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघ जाहीर..!

T20 World Cup | BCCIने १ जूनपासून सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२४ साठी आपल्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. त्याचबरोबर चार राखीव खेळाडूंची निवड केली आहे. तसेच रोहित शर्मा पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा सांभाळताना दिसणार आहे.

यावेळी वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने मेगा इव्हेंटचे आयोजन केले जाणार आहे, ज्यामध्ये २० संघ सहभागी होणार आहेत.

कशी असेल यंदाची टीम इंडिया :

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

हेही वाचा    –    ‘गुजरात अतृप्त आत्मा महाराष्ट्रात फिरतोय’; संजय राऊतांचं मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर 

राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान.

दरम्यान, ऋषभ पंतचं अपघातानंतर संघात पुनरागमन होणार असून संजू सॅमसन आणि शिवम दुबे या खेळाडूंची पहिल्यादाच विश्वचषकासाठी निवड झाली तर अनुभवी kl राहुल संघात जागा मिळाली नसल्याचे दिसून आले आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button