breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

स्टेट बँकेमध्ये होणार ८,000 पदांची भरती

नवी दिल्ली | महाईन्यूज

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल ८ हजार जणांची भरती होणार आहे. भरती क्लार्क या पदासाठी असून, महाराष्ट्रामध्ये खुल्या व राखीव प्रवर्गातील मिळून ८६५ पदे तर गोव्यातून १0 पदे भरली जातील. कोणत्याही शाखेच्या पदवीधराला या नोकरीसाठी अर्ज करता येईल. वयाची अट २0 ते २८ इतकीच आहे.

भरतीची ऑनलाइन प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झालेली आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत २६ जानेवारी असून, अर्जासोबत शुल्कही भरावे लागणार आहे. बँकेने कस्टमर सपोर्ट व सेल्स या विभागांत कनिष्ठ सहायक पदे भरण्याचे ठरविले आहे. मात्र, एका व्यक्तीला एकाच राज्यातून अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची सर्व माहिती स्टेट बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध केलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button