breaking-newsताज्या घडामोडीपुणे

सोशल डिस्टंसिंगचे पालन करत महानगरपालिकेची सर्व साधारण सभा घेण्यात आली…

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मागील जवळपास अडीच महिन्यांपासून पुणे महानगरपालिकेची सर्व साधारण सभा घेण्यात आली नव्हती. महापालिका अधिनियम कायद्यानुसार तीन महिन्यात जर सर्वसाधारण सभा न झाल्यास नगरसेवक पद जाण्याचीही शक्यता असते. म्हणून आज पुणे महापालिकेत सर्व प्रकारची काळजी घेत सर्वसाधारण सभा पार पडली. महपौर मुरलीधर मोहोळसह सर्व नगरसेवक व अधिकाऱ्यांनी सभागृहात येण्याअगोदर सॅनिटायझरने हात स्वच्छ करत तसेच स्क्रीनिंग देखील करून घेतलं…

यावेळी महापालिकेत येणार्‍या प्रत्येक नगरसेवक, अधिकारी वर्गाला हातावर सॅनिटायझर देत, स्क्रीनिंग करण्यात आलं. तसेच सभागृहात प्रत्येक नगरसेवकासाठी सोशल डिस्टंन्सिंग ठेवून बैठक व्यवस्था करण्यात आली होती.

या सभेमध्ये शहराच्या सद्यस्थितीवर प्रशासन कसं काम करत आहे, यावर चर्चा करण्यात यावी अशी विरोधकांकडून मागणी करण्यात येत होती. मात्र महापौरांनी सर्वजन मोठ्यासंख्येने एकत्र जमल्यानं कोरोना संसर्गाच्या दृष्टीने हे योग्य नसल्याचं सांगत चर्चा करण्यास नकार दिला. तसेच, क्षेत्राय कार्यालयातील उपआयुक्त दर्जाचा अधिकारी तुम्हाला माहिती देईल, अस सांगितल.मात्र ही गोष्ट अमान्य करत विरोधक आक्रमक झाले. त्यामुळे मतदान घेत सभा तहकुब करण्यात आली.

राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. मुंबई व पुणे ही दोन्ही महत्वाची शहरं कोरोनाबाधितांच्या संख्येबाबत आघाडीवर आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button