breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

GOOD NEWS: नवे नियम, नवीन कलाकार, ‘बिग-बॉस 14’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, तारीख ठरली

मुंबई : ‘बिग बॉस’च्या नवीन सीजनबाबत चर्चा सुरु झालेली आहे (Bigg Boss 14). ‘बिग बॉस-14’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे. नुकतंच याचा एक 22 सेकंदांचा टीझर लॉन्च करण्यात आला आहे. रिपोर्ट्सनुसार, बिग बॉसचं नवीन पर्व येत्या 27 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा बिग बॉसमध्येही अनेक बदल पाहायला मिळू शकतात.

‘बिग बॉस-14’चं ग्रँड प्रीमिअर 27 सप्टेंबरला कलर्स टीव्हीवर होईल, अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. या कार्यक्रमाचं शूट‍िंग ऑन-एअर व्हायच्या दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 25 आणि 26 सप्टेंबरला होईल. 26 सप्टेंबरला स्पर्धक बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतील. हा कार्यक्रम टीव्हीवर 27 सप्टेंबरपासून ऑन एअर होईल. मात्र, सध्या याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये.

‘बिग बॉस 14’चा सेट मुंबईतील फिल्म सिटीमध्ये असेल. इथे महत्त्वाची खबरदारी घेतली जाईल. होस्ट म्हणून अभिनेता सलमान खान या महिन्यातच शोचं शूटिंग सुरु करणार आहे. यंदाचा बिग-बॉस कोरोना आणि सोशल डिस्टन्सिंगच्या लॉकडाऊनच्या थीमवर असेल. या नवीन पर्वात सलमान खान एका एपिसोडसाठी तब्बल 16 कोटी रुपये घेणार असल्याची चर्चा आहे.

https://m.facebook.com/ColorsTv.BiggBoss/videos/245220496434245/

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button