विदर्भात वाऱ्यासह गारांचा पाऊस पडण्याचा हवामान खात्यचा इशारा
दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा किंचितसा वाढत असला, तरी अद्यापही राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी दिवसाचे तापमान सरासरीच्या तुलनेत १ ते २ अंशांनी खालीच आहे. मुंबईमध्ये एव्हाना उन्हाळ्याला सुरवात व्हायला हवी होती मात्र हवा तसा उन्हाळा सुरु झालेला पहायला मिळत नाहीये. दरम्यान मुंबई सोबतही राज्यात बहुतांश ठिकाणी सध्या ढगाळ हवामानाची स्थिती आहे… विदर्भामध्येही वादळी पाऊस आणि गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
अरबी समुद्रातून सध्या वारे वाहत आहेत. त्याचप्रमाणे मध्य प्रदेश ते तमिळनाडूच्या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा आहे. परिणामी राज्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. प्रामुख्याने विदर्भामध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाडय़ातील काही भागातही पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विदर्भामध्ये या दोन दिवसांत सोसाटय़ाच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.