breaking-newsमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख ३ हजार ८४ वर

  • मुंबईत १,३०४, पुण्यात २,६३९ नवे रुग्ण

मुंबई – महाराष्ट्राने शनिवारी ५ लाख कोरोना रुग्णांचा टप्पा ओलांडला. दिवसभरात विक्रमी १२ हजार ८२२ नव्या बाधितांची नोंद झाली असून २७५ जणांचा मृत्यू झाला. तर दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात ११ हजार ८१ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. आता राज्यातील एकूण रुग्णसंख्या ५ लाख ०३ हजार ८४ वर पोहोचली आहे. या रुग्ण संख्येपैकी ३ लाख ३८ हजार ३६२ जण कोरोनामुक्त झाले असून १ लाख ४७ हजार ०४८ रुग्ण प्रत्यक्ष उपचार घेत आहेत. तर एकूण १७ हजार ३६७ रुग्ण कोरोनाचे बळी ठरले आहेत.

मुंबईत शनिवारी दिवसभरात कोरोनाचे १ हजार ३०४ नवे रुग्ण आढळले, तर ५८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यासह मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ लाख २२ हजार ३३१ वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा ६ हजार ७४८ इतका झाला आहे. तर काल एका दिवसात १ हजार ४५४ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. मुंबईत आतापर्यंत ९५ हजार ३५४ जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर १९ हजार ९३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पुणे जिल्ह्यात शनिवारी २ हजार ६३९ नवे कोरोना रुग्ण आढळले. यात पुणे शहरातील १ हजार २९० जणांचा समावेश आहे. तर शनिवारी दिवसभरात पुण्यात ७० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एका दिवसातील कोरोनाबळींचा हा सर्वोच्च आकडा आहे. यासह पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता १ लाख ५ हजार ५२३ वर पोहोचली आहे. तर ७६ हजार ७२६ जण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत २ हजार ४१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button