breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मुंबईत करोना संसर्ग वाढतोय? आढळले ३३० नवीन रुग्ण

 मुंबई : राज्यात सलग तिसऱ्या दिवशी नवीन करोनाबाधितांची संख्या ५००पेक्षा अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. शनिवारी ५२९ नवीन करोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. यात मुंबईतील ३३० नवीन बाधितांचा समावेश आहे. राज्यात एकूण दोन हजार ७७२ करोनाबाधित रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

दिवसभरात ३२५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण ७७ लाख ३४ हजार ७६४ बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०९ टक्के इतके आहे. मुंबई महापालिकेच्या हद्दीत शनिवारी ३३० नवीन करोनाबाधितांचे निदान झाले. यामुळे मुंबईतील करोना बाधित रुग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या १० लाख ६३ हजार ६८१ इतकी झाली आहे.

ठाणे जिल्ह्यात शनिवारी पुन्हा एकदा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून जिल्ह्यात दिवसभरात नवीन ८० रुग्ण आढळले. यापैकी ठाणे शहरात ३७, नवी मुंबई २९, कल्याण-डोंबिवली ७, मिरा-भाईंदर ६, ठाणे ग्रामीणमध्ये एक रुग्ण आढळला आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत ७ लाख ९ हजार ८७५ रुग्ण आढळले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button