breaking-newsताज्या घडामोडी

Good News: आता रेल्वेची बटनंही महिलांच्या हाती

सोलापूर | महाईन्यूज

अत्यंत गरीब परिस्थितीचा सामना करून शिक्षण घेतलेली २६ वर्षीय स्नेहल रविकुमार अंबरकर ही लवकरच सोलापूर विभागात लोकोपायलट (रेल्वे चालक) म्हणून रुजू होणार आहे. सोलापूर शहरातील न्यू पाच्छापेठेत राहणारी स्नेहल हिचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण अमर मराठी विद्यालयात झाले आहे.

स्नेहलने लहानपणापासून मोठं काहीतरी होण्याचं स्वप्न उराशी बाळगले होते. त्यानुसार तिने प्राथमिक, माध्यमिक, उच्च व इंजिनिअरिंगचे शिक्षण चांगल्या गुणांनी पूर्ण केले़ शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्नेहलने लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणा-या परीक्षेची तयारी सुरू केली अन् काही परीक्षा तिने दिल्या देखील़ सुरुवातीला तिला अपयश आले. मात्र अपयशाने खचून न जाता तिने जिद्दीने पुन्हा परीक्षा दिल्या अन् लोकोपायलटची परीक्षा ती उत्तीर्ण झाली, तिचे सध्या भुसावळ येथील प्रशिक्षण संपले असून, सोलापूर विभागात तिची नियुक्ती झाली आहे.

स्पर्धा परीक्षेंतर्गत आयपीएस, आयएएस व इतर विविध पदांच्या परीक्षा दिल्या स्नेहल हिचे वडील किराणा दुकान चालवितात तर आई ही घरकाम करते मोठी बहीण ही ग्रामीण पोलीस दलात सायबर क्राईम विभागात कार्यरत आहे स्नेहलला दोन भाऊ असून, दोघांचेही उच्च शिक्षण झाले आहे. लवकरच तेही शासकीय नोकरीत दाखल होतील, असे वडील रविकुमार अंबरकर यांनी सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button