breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कचरा संकलनाची आरोग्य विभागाकडून फेरनिविदा प्रसिध्द

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  पिंपरी-चिंचवड शहराचे दोन भाग करून दोनच ठेकदारांना आठ वर्षांसाठी कचरा संकलन व वाहतुकीचे कोट्यवधी रुपयांचे काम देण्याचा महापालिकेचा ठेका वादाचे कारण ठरला. भ्रष्ट्राचार व गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे अखेर ही निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली. या कच-याच्या कामाची फेरनिविदा काढण्यात आली आहे. मात्र, कामासाठी फेरनिविदेत शहराचे दोनऐैवजी चार तुकडे करण्यात आले आहेत. तर, कामाची मुदत पूर्वीप्रमाणे आठ वर्षेच ठेवण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील 8 प्रभाग क्षेत्रातील घरोघरचा कचरा गोळा करुन तो मोशी कचरा डेपोपर्यंत वाहून येथे नेण्याच्या  कामाची निविदाप्रक्रिया राबविण्यात आली. हे काम ए. जी. इनव्हायरो इंफ्रा आणि बीव्हीजी या दोन संस्थांनी करण्याची तयारी दर्शविली होती. आठ वर्षांच्या कालावधीसाठी हे काम दिले जाणार असून ठेकेदाराला दरवर्षी दरवाढही दिली जाणार आहे. दोनच ठेकेदार व त्यांनी कचरा संकलनासाठी प्रतिटन दिलेले दर बघता या ठेक्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. स्थायी समितीने या कामाला मंजुरी दिली. परंतु, विरोधकांनी न्यायालयात धाव घेतल्याने आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ही निविदाप्रक्रिया रद्द केली. त्यावरून पालिकेचे राजकारण ढवळून निघाले होते.

दरम्यान, सहा महिन्यांनंतर फेरनिविदेचे काम पुर्ण झाले आहे. आरोग्य विभागाने ही निविदा प्रसिध्द केली आहे. दोन ऐवजी प्रत्येकी दोन प्रभाग एकत्रित करून चार भागात ही निविदा काढण्यात आली आहे. कामाची आठ वर्षे मुदत, वाहतुकीसाठी ठेकेदाराने वाहने, कर्मचारी पुरविणे या बाबी आधीच्या निविदाप्रमाणेच आहेत. प्रत्येकी दोन प्रभागातील काम करण्यासाठीची सुमारे 13 कोटींची निविदा असून शहरातील संपुर्ण काम सुमारे 50 कोटी रुपये खर्चाचे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button