breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘प्राईड ऑफ पिंपरी-चिंचवड’; प्रातिनिधिक २५ कोरोना योद्धांचा होणार सन्मान

पिंपरी चिंचवड – कोरोनाविरोधातील लढाई ही महाराष्ट्रासाठी मिशन आहे. गेल्या जवळपास वर्षभर ही लढाई लढण्यासाठी अनेक कोरोना योद्धांनी यात आपले बलिदान देखील दिले. तर अनेक योद्धे दिवसरात्र या विषाणूशी लढत होते. कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य अन् सुरक्षिततेसाठी लढणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील प्रातिनिधिक स्वरुपात २५ कोरोना योद्धांचा गौरव केला जाणार आहे.

वाचा :-PCMC मध्ये नववर्षाच्या पहिल्याच दिवशी वाहनांची तोडफोड

चिखली- मोशी- चऱ्होली हाउसिंग सोसायटी फेडरेशनच्या पुढाकाराने ‘अनसंग वॉरिअर्स, प्राईड ऑफ पिंपरी-चिंचवड’ या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात शनिवारी, दि. २ जानेवारी २०२१ रोजी सांयकाळी ५ वाजता हा सन्मान व पुरस्कार वितरण सोहळा होईल.

यावेळी पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती फेडरेशनचे सचिव संजीवन सांगळे यांनी दिली.

पुरस्कारार्थींचे नाव पुढीलप्रमाणे :
एम.ए. हुसेन, रिअल पीपल, रिअल लाईफ संस्था, थेरगाव सोशल फाउंडेशन, डॉ. विनायक पाटील, वैद्यकीय अधिकारी, वायसीएम हॉस्पिटल, डॉ. शंकर मोहसलगी, रक्त संक्रमण अधिकारी, वायसीएम रक्तपेढी, सहगामी फाउंडेशन, मंगेश चितळे, भांडार विभाग प्रमुख, पिंपरी-चिंचवड, सोनू गिरधारी खंडारे, जयविंदरसिंग सोखी, गुरूद्वारा प्रमुख, आकुर्डी, डॉ. अभयचंद्र दादेवार, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, वायसीएम हॉस्पिटल, नर्सेस ग्रुप, वायसीएम हॉस्पिटल, पत्रकार कै. पांडुरंग रायकर, पुणे, संस्कार प्रतिष्ठान, विनायक वर्पे, पोलीस नाईक, भोसरी, के. सी. गर्ग, पिंपरी-चिंचवड को. ऑप. हाउसिंग सोसायटी फेडरेशन, मिलिंद माळी, वॉर्डबॉय, मारुती जाधव, रुग्णवाहिका चालक, कै. तुकाराम तनपुरे फाउंडेशन संचलित पोलीस व नागरिक मित्र संघटना, योगेश सेठीया, संदेश गॅस कंपनी, नागेश वाघमारे, शवविच्छेदन विभाग, मनपा हॉस्पिटल, लघुउद्योग भारती संस्था, पिंपरी-चिंचवड शाखा, गिरीश प्रभुणे, अध्यक्ष पुनरुत्थान समरसता गुरूकुलम, बबन पवार, सफाई कर्मचारी, मनपा रुग्णालय, भोसरी, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, केसर व्हॅली सोसायटी, रमेश सातव, अध्यक्ष रोटरी क्लब, उद्योगनगरी.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button