breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवड

चांगले कर्म हाच जीवनाचा मूलमंत्र! : लेफ्टनंट उपेंद्र खांबेटे

पुनावळेतील डी.एस.के. कुंजबन सोसायटीमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

पिंपरी : भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी क्रांतिकारकांनी बलिदान दिले. इंग्रजांच्या राजवटीतून आपली मुक्तता झाली. आपण आता स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत. मग, आपली राष्ट्राप्रति, मातृभूमीप्रति कर्तव्ये जपली पाहिजेत. सामाजिक भान ठेवले पाहिजे. नैतिक कर्तव्यांची जाणीव असावी आणि  ‘चांगले कर्म’ हाच जीवनाचा मूलमंत्र आहे, असे मत नौदलाचे निवृत्त लेफ्टनंट उपेंद्र खांबेटे यांनी व्यक्त केले. 

पुनावळे- काटेवस्ती येथील डी.एस.के. हाउसिंग सोसायटीत भारताचा ७६ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लेफ्टनंट खंबाटे बोलत होते. यावेळी सोसायटीचे चेअरमन योगेश सूर्यवंशी, खजिनदार युवराज पाटील, कमिटी सदस्य अभिजित वाळवेकर, संजय पाटील, संदीप पाटील, विजय कांबळे, अमेय लाटकर, अधिकराव दिवे आदी उपस्थित होते.

लेफ्टनंट खांबेटे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सुरक्षा विभागाकडून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. राष्ट्रीगीत व महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करुन कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. सोसायटीचे मुख्य व्यवस्थापक श्रीधर पन्हाळकर आणि व्यवस्थापक मेहताब मोमीन आणि सहकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात पुढाकार घेतला. रांगोळी, तिरंगा पताका, सजावट आणि राष्ट्रभक्तीची गीते यामुळे सोसायटीचे वातावरण मंगलमय झाले होते. सोसायटीतील रहिवाशांनी ध्वजारोहण आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सांस्कृतिक कार्यक्रमासाठी विशेष पुढाकार घेतल्याबद्दल प्रियंका दिवे-पाटील, नेहा वाळवेकर, प्रज्ञा पाटील, कविता पाटील, आकांक्षा देसाई, भाग्यश्री सूर्यवंशी, कस्तुरी केदारी, दिप्ती पाटील यांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन अधिकराव दिवे यांनी केले.

सांस्कृतिक कार्यक्रमात देशभक्तीचा जागर…  

स्वांतत्र्यदिनी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सोसायटीतील मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. समरजीत पाटील, आरव वावगे, आर्या कसुरकर, पृथ्वी पाठक, रोहिणी कुलकर्णी, मुद्रा कुष्टे, अथर्व वैद्य, अनिका नाईक, अद्वैत पाटील, आराध्या दिवे-पाटील, ऋणी वाळवेकर, स्वरांजली पाटील, विहान सूर्यवंशी, अबीर खंडेलवाल, किंजल केदारी, अन्वी वाळवेकर, मृन्मयी देसाई, संयोगिता पाटील, वंशिका पवार, वैभवी सूर्यवंशी, गार्गी पाटील, गिरीशा गायकवाड, यशिता, अहना, ज्युई जोगळेकर, प्रत्युष, क्रिशू आदींनी आपआपल्या गटात उत्तम सादरीकरण केले. तसेच, ज्येष्ठ नागरिक प्रदीप पवार यांनी देशभक्तीपर रोमहर्षक गीत सादर केले. उपस्थितीत रहिवाशांनी भारत माता की जय… वंदे मातरम्‌… अशा घोषणा देत मुलांचा उत्साह वाढवला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button