breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदेश-विदेश

Chandrayaan-३ : चंद्राभोवतीच्या प्रक्रिया पूर्ण, उद्या महत्वाचा टप्पा!

Chandrayaan-३ : चांद्रयान-३ मिशनकडे संपुर्ण जगाचे लक्ष लागले आहे. आत्तापर्यंत जसं ठरवलंय तसं घडत आहे. या मिशन साठी आजचा आणि उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे. इस्त्रोकडून चांद्रयान-३ विषयी महत्वाची माहिती दिली आहे.

इस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार, सध्या चांद्रयान हे चंद्राभोवती १५३x१६३ एवढ्या कक्षेत फिरत असल्याचं इस्रोने सांगितलं आहे. आता पुढील टप्प्यामध्ये उद्या (१७ ऑगस्ट) प्रॉपल्शन मॉड्यूल आणि लँडर मॉड्यूल हे एकमेकांपासून वेगळे होतील. याची वेळ अद्याप इस्रोने जाहीर केली नाही.

हेही वाचा – इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा ‘जय सियाराम’चा नारा!

चांद्रयानामध्ये असणाऱ्या लँडरच्या आत रोव्हर फिट करण्यात आलं आहे. या दोन्हीला मिळून लँडर मॉड्यूल म्हटलं जातं. आता प्रॉपल्शन मॉड्यूल हे लँडर मॉड्यूलला चंद्रापासून १०० किलोमीटर उंचीवरील कक्षेत नेईल. त्यानंतर हे दोन्ही एकमेकांपासून वेगळे होतील.

यानंतर लँडर मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागाच्या दिशेने प्रवास करेल. साधारणपणे २३ ऑगस्ट रोजी चांद्रयान-३ हे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करेल. ही मोहीम यशस्वी झाल्यास चंद्रावर उतरणारा भारत हा चौथा देश ठरणार आहे. १४ जुलै रोजी चांद्रयान-३ ने अवकाशात झेप घेतली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button