breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

“मराठी माणूस पंतप्रधान झाला पाहिजे, मग तो..”; मराठी अभिनेत्याचं ट्वीट चर्चेत

सध्याची परिस्थिती लक्षात घेता आपला माणूस पंतप्रधान होईल?

मुंबई : मराठी अभिनेता संदीप पाठक आपल्या उत्तम अभिनयासाठी ओळखला जातो. तो सोशल मीडियावर ही प्रचंड सक्रीय असतो. समाजातील अनेक मुद्दयांवर तो भाष्य करत असतो. त्याच्या या पोस्ट चर्चेचा विषय ठरतात. अशातच त्याने केलेलं एक ट्वीट सध्या चांगलच चर्चेत आहे.

मा. बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती की “मराठी माणूस” पंतप्रधान झाला पाहिजे, मग तो कोणत्याही पक्षाचा असेल. पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता आपला माणूस पंतप्रधान होईल?? जरा कठीण वाटतंय.., असं अभिनेता संदीप पाठक याने ट्वीट मध्ये म्हटलं आहे. यामध्ये त्याने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, आप, भाजपा अशा राज्यातील सर्वच पक्षांना टॅगही केलं आहे.

संदीप पाठकच्या ट्वीटवर नेटकरी कमेंटही करत आहेत. त्यातील अनेकांनी कमेंटमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची नावं पोस्ट केली आहेत. तर काहींनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव पोस्ट केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button