breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरातील घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी नवीन घंटागाड्या सेवेत दाखल

पिंपरी, (महाईन्यूज) – महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये घरोघरचा कचरा गोळा करणे व त्याची वाहतूक करण्याच्या कामाचे उदघाटन आज सोमवारी (दि. १) महापौर राहूल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांच्या हस्ते करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या फ प्रभागातील कृष्णानगर येथे नवीन घंटागाड्यांचा शुभारंभ करण्यात आले. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सहा. आयुक्त मनोज लोणकर, आणि मे.बीव्हीजीचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महापालिकेच्या ८ क्षेत्रिय कार्यालयातील ३२ प्रभागामध्ये स्थानिक सन्मानीय नगरसेवकांच्या शुभहस्ते नवीन गाड्या सेवेत आणण्यात आल्या आहेत. शहरातील घरोघरचा कचरा गोळा करणे व वाहतुक करण्याचे काम आरोग्य विभागाने मे. ए. जी. एन्व्हायरो इन्फ्रा. व मे. बी. व्ही. जी. इंडीया लि. यांना देण्यात आले होते.

यापुर्वीची वाहने जुनी असल्याने कचरा वाहतुक करतांना वारंवार बंद पडत होती. त्यामुळे कचरा गोळा करणे व वाहतुक करणेचे कामास अडथळा निर्माण होत होता. आता दोन्ही संस्थांनी नविन वाहने घेऊन घरोघरचा कचरा गोळा करणे व वाहतुक करणेचे कामास सुरुवात केली आहे. तसेच दोन्ही संस्थांनी बहुतांशी जुन्या कामगारांना याकामात समाविष्ट केले आहे. सदरच्या कामामुळे स्वच्छ भारत अभियांना अंतर्गत महापालिकेच्या नामांकनात १०० टक्के वाढ होईल अशी खात्री महापौर जाधव, पक्षनेते पवार, सभापती मडिगेरी यांनी व्यक्त केली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button