breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

अदानींना मोठा झटका! अमेरिकेच्या स्टॉक्स एक्सचेंजमधून बाहेर

अदानी एंटरप्रायजेसच्या शेअर्समध्ये मागील 5 दिवसांत 50% घसरण

मुंबई : भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांना रोज नवनवीन धक्के बसत आहेत. 2023 च्या सुरुवातीस, गौतम अदानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण हिंडेनबर्गच्या अहवालानंतर गौतम अदानी यांची घसरण सुरु झाली. आता ते केवळ टॉप-१० श्रीमंतांच्या यादीतूनच नाही तर टॉप-२० मधूनही बाहेर झाले आहेत.

सार्वजनिक कंपन्यांच्या शाश्वत कामगिरीचे मूल्यांकन करणाऱ्या US स्टॉक एक्सचेंज डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्समधून अदानी एंटरप्रायजेसला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. परिणामत: भारतीय शेअर बाजारात अदानी एंटरप्रायजेसच्या शेअर्समध्ये सकाळी 35 टक्क्यांपर्यंत घसरण दिसून आली.

अदानी एंटरप्रायजेसच्या शेअर्समध्ये मागील 5 दिवसांत 50% घसरण नोंदवली गेली तर आज दुपारी शेअर्समध्ये रिकव्हरी झाली तरीही 2.42 च्या सुमारास एका शेअरची किंमत 1535 रुपये झाल्याचं दिसलं. हिंडेनबर्गचा अहवाल येण्यापूर्वी अदानींचा 1 शेअर 3500 रुपयांच्या जवळपास होता. मागील 9 दिवसांमध्ये कंपनीचे शेअर्स 70% घसरले आहेत.

दरम्यान, हिंडेनबर्गच्या अहवालानुसार, अदानी ग्रुपने आपल्या कंपन्यांना ८५ टक्क्यांपेक्षा अधिक मूल्यावान दाखविण्यात आले आहे. तसेच, अदानी समूह मोठ्या कर्जामुळे दबावाखाली येऊ शकतो. अदानी समूहात सर्व काही ठीक नसल्याचा दावा करण्यात आला आहे. हा समूह अनेक दशकांपासून स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंट फ्रॉडमध्ये गुंतलेला आहे, असं म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button