ताज्या घडामोडी

भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने ‘अखंड हरिनाम सप्ताह गाथा पारायण’ सोहळ्याचे आयोजन

पिंपरी (Pclive7.com):- श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा हरिनाम सप्ताह येत्या दि.१४ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी दरम्यान भंडारा डोंगर येथे संपन्न होणार आहे. या महायज्ञाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
या हरिनाम सप्ताहात १४ फेब्रुवारी रोजी ह.भ. प. ज्ञानेश्वर माऊली कदम यांचे कीर्तन, १५ फेब्रुवारी रोजी ह. भ. प. भागवताचार्य विकासानंद महाराज मिसाळ यांचे कीर्तन, १६ फेब्रुवारी रोजी ह. भ. प. गुरुवर्य पांडुरंग महाराज गिरी यांचे कीर्तन, १७ फेब्रुवारी रोजी ह. भ. प. गुरुवर्य जयेश महाराज भाग्यवंत यांचे कीर्तन, १८ फेब्रुवारी रोजी ह.भ. प. बंडा महाराज कराडकरयांचे कीर्तन, १९ फेब्रुवारी रोजी ह. भ. प. चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचे कीर्तन, २० फेब्रुवारी ह.भ. प. ज्ञानेश्वर माऊली कदम यांचे कीर्तन संपन्न होणार आहे. ही कीर्तनसेवा रात्री ८ ते १० यावेळेत पार पडणार आहे.
२१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत काल्याचे कीर्तन संपन्न होणार असून, ह. भ. प. उमेश महाराज दशरथे मानवतकर आपली सेवा देतील. याबरोबरच १९ फेब्रुवारी रोजी दुपारी बारा ते दीड या वेळेत प्रबोधनकार गणेश शिंदे व गायिका सन्मिता गणेश शिंदे यांचा ‘मोगरा फुलला’ हा सुश्राव्य अभंगवाणीचा कार्यक्रम सादर होईल. तसेच दुपारी दोन ते सायंकाळी साडेचार या वेळेत मेघना झुझम (भिवर पाटील) या संत साहित्य व लोककला यावर आधारित ‘तुझ्या नामाचा गजर’ हा भक्तिमय कार्यक्रम सादर करणार आहेत.
याबरोबरच दि.१४ ते २० फेब्रुवारी दरम्यान दररोज सायंकाळी ४ ते ६ या वेळेत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज तत्त्वचिंतन होणार असून, ह.भ. प. रवीदास महाराज शिरसाट आपली सेवा देणार आहेत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांनी दिली.
वृक्षमित्र अरुण पवार यांनी केले भंडारा डोंगरावर वृक्षारोपनाचे संवर्धन आणि संगोपन
अखंड हरिनाम सप्ताह गाथा पारायण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष व राज्यस्तरीय वृक्षमित्र पुरस्काराने सन्मानित अरुण पवार यांनी भंडारा डोंगर परिसरात वृक्षारोपनाचे संगोपन आणि संवर्धन केले. तसेच यापूर्वी भंडारा डोंगरावर लावण्यात आलेल्या झाडांना पाणी देत आपण लावलेल्या झाडांची आपणच काळजी घेऊन पर्यावरणाला पोषक वातावरण निर्माण करूयात, असा संदेश दिला. वृक्षमित्र अरुण पवार यांनी डोंगर परिसरात लावलेली झाडे आज सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button