breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL 2020 : अंतिम चारमध्ये पोहोचण्यासाठी चुरस; आज पंजाब-कोलकाता आमने-सामने

शारजाह – इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) आज शारजाह क्रिकेट स्टेडियमवर किंग्स इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात लढत रंगणार आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील प्ले ऑफच्या दृष्टीने आजची लढत महत्त्वाची आहे. पंजाबचे आतापर्यंत ११ सामन्यांतील पाच विजय आणि सहा पराभवांसह १० गुण आहेत. तर कोलकाताचे ११ सामन्यांतील सहा विजय आणि पाच पराभवांसह १२ गुण आहेत. सध्या गुणतालिकेत कोलकाता चौथ्या आणि पंजाब पाचव्या स्थानी आहे. आता जर कोलकाताविरुद्धच्या लढतीत विजय मिळवता आला तर पंजाबला चौथे स्थान मिळवता येईल. याउलट कोलकाता जिंकला तर त्यांना चौथे स्थान राखता येईल. विशेष म्हणजे प्ले ऑफसाठीची चुरस तीव्र होत असताना दोन्ही संघांना पराभव परवडणारा नाही. त्यामुळे आजची लढत रोमांचक होणार हे निश्चित आहे.

कोलकाताने शनिवारी गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी असलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा ५९ धावांनी धुव्वा उडवला होता. नितीश राणाला सलामीला पाठवण्याचा कोलकाताचा प्रयोग भलताच यशस्वी झाला. सुनील नरिनची अर्धशतकी फटकेबाजीही दिल्लीविरुद्धच्या विजयात योगदान देणारी ठरली. तर फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने पाच बळी घेत त्याची गोलंदाजीची लय दाखवून दिली.

तर पंजाबने मागील चार लढतींमध्ये दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांना हरवत या हंगामात झोकात पुनरागमन केले. त्यामुळे या संघाच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत. गेल्या चार सामन्यांमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबने मिळवलेल्या यशामध्ये गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीचाही सिंहाचा वाटा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button