पिंपरी / चिंचवड

मोफा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सांगवीत बांधकाम व्यावसायिकावर फसवणुकीचा गुन्हा

पिंपरी l प्रतिनिधी

दिलेल्या मुदतीत बांधकाम पूर्ण करून दिले नाही. मोफा कायदायचे उल्लंघन केले, याबाबत एका बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पिंपळे गुरव येथील पेंन्टागॉन पर्ल येथे 23 जून 2019 पासून 24 एप्रिल 2022 या कालावधीत घडला.

आशिष भागवतसिंग तोमर (वय 46, रा, पिंपळे निलख) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कमारअली हमीद शेख (रा. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेख हे पिंपळे गुरव येथील पेंन्टागॉन पर्ल या सोसायटीचे प्रमोटर, डेव्हलपर आणि बिल्डर आहेत. त्यांनी फिर्यादी आणि आरती दिनेश प्रसाद यांना पेंन्टागॉन पर्ल या बिल्डींगचे काम पूर्ण करून करारानुसार ताबा देणे बंधनकारक असताना मोफा कायद्याचे उल्लंघन करून मुदतीत ताबा दिला नाही. करारातील अटी शर्तींचे शेख यांनी उल्लंघन केले. 23 जून 2019 पासून आजपर्यंत प्रत्येक महिन्याचे भाडे देण्यास नकार देऊन आर्थिक फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button