ताज्या घडामोडीदेश-विदेश

चार वर्षांनी गायक अजय पाठक यांना मिळाला न्याय

आरोपी हिमांशू सैनी याला फाशीची शिक्षा

शामली : उत्तरप्रदेशमधील प्रसिद्ध भजन गायक अजय पाठक व त्यांच्या कुटुंबाची ३० डिसेंबर २०१९ रोजी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाची आज (२२मे) कैराना जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली असून आरोपी हिमांशू सैनी याला न्यायालयाने फाशीची शिक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.

नेमकं प्रकरण काय ?
शामली शहरातील आदर्श मंडीच्या पंजाबी कॉलनी परिसरात भजन गायक अजय पाठक यांचा शिष्य हिमांशू सैनी याने अजय पाठक यांच्यासह पत्नी, मुलगा आणि मुलगी यांच्यावर तलवार आणि खंजीरने वार करून हत्या केली. आरोपी हिमांशू सैनी याला पोलिसांनी अटक केली होती. तर जिल्हा न्यायाधीश अनिल कुमार यांनी हिमांशू सैनी याला दोषी घोषित केले होते. त्यामुळे तब्बल चार वर्षांनी या प्रकरणाची कैराना जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली असून न्यायालयाने आरोपी हिमांशू सैनीला फाशीची शिक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.

हत्याकांडाची देशभर झाली होती चर्चा
पाठक कुटुंबाच्या हत्याकांडाचे पडसाद देशभर उमटले होते. अजय पाठक यांचा मोठे भाऊ हरिओम पाठक यांनी आदर्श मंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी हिमांशू सैनीला अटक करून जिल्हा न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायालयाने हिमांशू याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. व त्याला मुझफ्फरनगर कारागृहात पाठवण्यात आले. तेव्हापासून हिमांशू सैनी मुझफ्फरनगर तुरुंगात आहे.

आमच्या कुटुंबाला न्याय मिळाला
आरोपीला फाशीची शिक्षा झाल्यानंतर अजय पाठक यांचे भाऊ हरिओम यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, ”तब्बल चार वर्षांनी आमच्या कुटुंबाला न्याय मिळाला आहे.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button