breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा

पीक विमा मंजुर मात्र शेतकऱ्यांपासून दूर, अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईची प्रतीक्षा

– युवा रयत शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष आदित्य वने यांचा आंदोलनाचा इशारा

औरंगाबाद । महाईन्यूज । प्रतिनिधी

प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या लाभासाठी सन २०१९ च्या खरीप हंगामात तालुक्यातील नऊपैकी दोनच मंडलांमधील शेतकरी पात्र ठरले आहेत. उर्वरित सात मंडलांना शासनाच्या निकषांचा फटका बसल्याचे स्पष्ट झाले असून या वगळलेल्या मंडलांमधील शेतकऱ्यांमधून तीव्र असंतोष व्यक्त होऊ लागला आहे.

रयत युवा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष आदित्य वने यांनी म्हटले आहे  की, डाळींब, द्गाक्ष  मोसंबी आदी पिकांसाठी संपूर्ण तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या हिश्याची विमा संरक्षित रक्कम बजाज अलायन्स कंपनीकडे भरली होती. सन २०१९ च्या खरीप हंगामात सप्टेंबरपर्यंत समाधानकारक पाऊसच झाला नव्हता, तर त्यानंतर अतिवृष्टीमुळे शेेतकऱ्यांची उभी पिके वाया गेली होती. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळेल, या आशेवर शेतकरी बसले होते.

संबंधित पर्जन्यमापक यंत्रांबाबत भाळवणी येथील शेतकऱ्यांनी यापूर्वीही तक्रारी केल्या आहेत. तसेच सदोष पर्जन्यमापक व हवामान मोजमाप यंत्रणेेचा आधार घेऊन, विविध निषक लावून हजारो शेतकऱ्यांना विमा संरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवल्याचा आरोप करण्यात येत आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असताना चुकीच्या अहवालावरून त्यांना वंचित ठेवले जात असेल, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही वने यांनी दिला. विमा कंपनीचा तुघलकी कारभार रोखून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे, अशी मागणीही त्यांनी केली.

याबाबत संकट कुठलेही असो सर्वप्रमथ त्याचा फटका बसतो तो सर्वसामान्य शेतकऱ्यांनाच. कोरोनाचा सर्वाधिक परिणामही या घटकावर झाला. त्यापेक्षाही कृत्रीम संकट हे शेतकऱ्यांना मारक ठरत आहे. कृषी हंगाम २०१९-२० मध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी पीक मंजूर होईनही संकटाच्या काळात त्यांना त्याचा आधार मिळालेला नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button