breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

युवक कॉंग्रेस आक्रमक, भाजपचे माजी मंत्री राम शिंदेंच्या अकलेचे काढले दिवाळे

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
भाजपचे माजी मंत्री राम शिंदे हे नुकतेच पिंपरी-चिचंवड शहरात आले होते. त्यांनी काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांच्या चारित्र्याशी संबंधीत शंका उपस्थित करून टीका केली होती. या टिकेला शहर युवक काँग्रेसच्या पदाधिका-यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राहूल गांधी यांचा जन्म देशभिमान जपण्यासाठी त्याग, बलिदान आणि समर्पण यासाठी झालेला आहे, अशा शब्दांत युवक काँग्रेसने माजी मंत्री शिंदे यांच्या अकलेचे दिवाळे काढले.

पिंपरी-चिंचवड शहर युवक कॉंग्रेसच्या वतीने प्रसिध्दीपत्रक काढून माजी मंत्री राम शिंदे यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. शिंदे हे पिंपरी-चिंचवड शहरातील पदाधिका-यांच्या निवडी जाहीर करण्यासाठी शहरात आले होते. कॉंग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी एका कार्यक्रमात विनायक दामोदर सावरकर यांच्याविरोधात टिका केली होती. या टिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदे यांनी राहूल गांधी यांना भारतीय संस्कृती माहीत नाही, ते हायब्रीड व्हर्जन आहेत, ते इंडो- ईटालियन व्हर्जन आहेत, अशी टिका करून त्यांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता.

शिंदे यांनी टीका करताना राहूल गांधींच्या जन्माचा मुद्दा मांडला व त्यांनी राहूल गांधी यांना भारतीय संस्कृती माहीत नाही. ते हायब्रीड व्हर्जन आहेत. ते इंडो- ईटालियन व्हर्जन आहेत, अशी टीका केली होती. सावरकर यांच्यावरील टिकेवरून राहूल गांधी यांच्यावर टिकाच करायची होती तर, त्यांनी वास्तविक मुद्यांच्या आधारे ती करायला हवी होती. मात्र, माजी मंत्री असलेल्या शिंदेनी अत्यंत खालची पातळी गाठत अकलेचे तारे तोडले आहेत, अशी संतप्त टिका युवक कॉंग्रेसच्या पदाधिका-यांनी केली आहे.

  • राम शिंदेंची किव येते

वैचारिक उत्तर देण्याची पात्रता नसणा-या व्यक्ती वैयक्तिक टिका टिप्पणी करतात. मूळ मुद्यांनावरून लोकांची दिशाभूल करतात, हाच भाजपचा खरा चेहरा आहे. यानिमित्ताने तो पुन्हा जनतेच्या समोर आला आहे. राहूल गांधी हे राजीव गांधी यांचे पुत्र आहेत. देशासाठी प्राण द्यावे लागलेल्या आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते दिवस रात्र झटत आहेत. देशभर फिरून ते देशातील एकात्मतेसाठी लढत आहेत. अन्यायाविरोधात आंदोलने करत आहेत. शेतकरी, गोरगरीब, पिडीत, शोषित, दिन, दूर्बल सर्वांचे अश्रू पुसण्याचे काम करणा-या नेत्याला देशाची संस्कृती माहीत नसेल का ? माणूस जन्माने नाही तर कर्माने मोठा होतो. ही साधी बाब शिंदे यांच्या आकनात नसावी का ? याची किव येते. केवळ प्रसिध्दीसाठी बड्या व्यक्तींवर टिका करणे हे शिंदेच्या मनोवृत्तीचे दर्शन घडवते, अशी टिका युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button