ताज्या घडामोडीमुंबईव्यापार

बीएसईची जागतिक बाजारपेठेत उंच उडी

शेअर बाजार मार्केट कॅपमध्ये जगात पाचव्या स्थानावर

मुंबई : बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलाने २१ मे रोजी नवीन उच्चांक गाठला. या काळात प्रथमच कंपन्यांचे मार्केट कॅप पाच ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेले आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या (BSE) वेबसाइटनुसार, एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध सर्व कंपन्यांचे मार्केट कॅप मंगळवार २१ मे रोजी ५.०१ लाख कोटी डाॅलर म्हणजेच ४१२ लाख कोटी रुपये झाले आहे.

भारतीय शेअर बाजार सुस्साट
या वर्षाच्या सुरुवातीपासून बाजार भांडवलात ६२२ अब्ज डाॅलरहून अधिक वाढ झाली आहे. मात्र सेन्सेक्स अजूनही १.६६ टक्क्यांच्या सार्वकालिक उच्चांकाच्या खाली आहे. तर बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकाने २१ मे रोजी विक्रमी उच्चांक गाठले आहेत.

बीएसई कंपन्यांचे मार्केट कॅप
विशेष म्हणजे मागील वर्षी नोव्हेंबर २०२३ मध्ये बीएसईवर सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल चार ट्रिलियन डाॅलरवर पोहोचले होते. तर आता अवघ्या सहा महिन्यांत मार्केट कॅपने पाच ट्रिलियन डाॅलरच्या उच्चांकावर मुसंडी मारली आहे. यापूर्वी बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप मे २००७ मध्ये एक ट्रिलियन डाॅलर झाले होते त्यानंतर, दोन ट्रिलियन डाॅलरपर्यंत पोहोचण्यासाठी एक दशक लागले आणि जुलै २०१७ मध्ये मार्केट कॅपने हा आकडा ओलांडला असून मे २०२१ मध्ये मार्केट कॅपने तीन ट्रिलियन डाॅलरचा टप्पा ओलांडला.

सध्या जगभरातील केवळ चार देशांच्या शेअर बाजाराचे मार्केट कॅप पाच ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त असून या देशांमध्ये अमेरिका आघाडीवर आहे तर चीन, जपान आणि हाँगकाँग स्टॉक मार्केट भारतीय बाजाराच्या पुढे आहेत. अमेरिका ५५.६५ ट्रिलियन डाॅलर मार्केट कॅपसह आघाडीवर असून त्यानंतर चीन (९.४ ट्रिलियन डाॅलर), जपान (६.४२ ट्रिलियन डाॅलर) आणि हाँगकाँग (५.४७ ट्रिलियन डाॅलर) यांचा क्रमांक लागतो.

ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, भारताच्या बाजार भांडवलात २०२४ मध्ये आतापर्यंत सुमारे १२% वाढ झाली तर, या काळात अमेरिकन बाजारपेठेत १०% वाढ नोंदवली गेली असून हाँगकाँगचा शेअर बाजार १६ टक्क्यांनी वधारला आणि चीन व जपानचे मार्केट कॅप मोठ्या प्रमाणावर स्थिर राहिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button