breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांकडून जनतेचे प्रश्न सुटत नाही, म्हणूनच राज्यपालांकडे जावे लागते – चंद्रकांत पाटील

पुणे |महाईन्यूज|

उद्धव ठाकरे हे फक्त नावालाच मुख्यमंत्री आहे. शरद पवारच महाराष्ट्र चालवतात. यावर संजय राऊत यांनीच आता शिक्कामोर्तब केले आहे. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यातील वाढीव वीज बिल, मराठा आरक्षण, ओबीसी समाज, धनगर समाज आरक्षण, अतिवृष्टीच्या नुकसान यांसह कोणत्याच प्रश्नावर मार्ग काढला जात नाही. त्यामुळे जनतेच्या मनात मुख्यमंत्री हे कोणत्याही प्रश्नावर मार्ग काढू शकत नाही अशी भावना निर्माण झाली आहे. याचमुळे जो तो आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्यपालांची भेट घेत आहेत. त्यामागे निदान राज्यपाल तरी मुख्यमंत्री किंवा संबंधित खात्यांच्या मंत्र्यांना सूचना देऊन त्यांचे प्रश्न निकाली काढतील अशी त्या नेते मंडळी व नागरिकांची भावना आहे. असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे.

सातत्याने कुणावर ना कुणावर टीका करत राहणे हे संजय राऊत यांच्या नोकरीचा भाग आहे. एखाद्यादिवशी त्यांनी जर भाजपवर टीका केली नाही देवेंद्र फडणवीस यांच्यासह माझ्यावर अग्रलेख लिहिला नाही तर त्यांना जाब विचारला जाऊ शकतो. म्हणून टीका टिपण्णी करण्याचे काम करतात. ते त्यांनी जरूर करावे. आणि सत्तेत आल्यापासून तर महाविकास आघाडी सरकारने घटना बंदच करून ठेवली आहे.

वाट्टेल ते शब्दात सरकारमधील सहभागी नेते मंडळी वाट्टेल या शब्दात टीका करत सुटले आहे.त्यांनी कुणावरही टीका केली तरी चालते मात्र कुणी त्यांच्यावर टीका केली तर त्याच्यावर कारवाईचा बडगा उचलतात. हे योग्य नाही, अशा शब्दात राज्य सरकारवर टीकास्त्र सोडत चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारचे धोरण हे दुटप्पीपणाचे असल्याचे स्पष्टपणे सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button