breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आळंदी देवाची येथे लवकरच अन्नछत्र सुरू करणार : बाबा  कांबळे

नानासाहेब आबनावे यांचा आळंदी येथे  सत्कार सोहळा : विद्यार्थ्यांसाठी अन्नछत्र सुरू करणार!

पिंपरी:  आळंदी देवाची येथे धार्मिक शिक्षण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी येत असून त्यांची व  इथे येणाऱ्या भाविक भाविकांची उपासमार होत असून  त्यांनी जेवण्याची व्यवस्था व्हावी या साठी समस्त हराळे वैष्णव समाज  धर्मशाळा आळंदी देवाची येथे रोज ५००, लोकांसाठी जेवनाची करण्याच्या प्रयत्न असून लवकरच अन्नछत्र सुरू करणार आहोत, मी स्वतः आळंदी मध्ये धार्मिक शिक्षण घेतले असून, मधुगिरी व भिक्षा मागून मी आयुष्य जगलो आहे त्याकाळी एक वेळ उपाशी राहून आम्ही शिक्षण घेतले, मराठवाडा, खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातून आजही अनेक विद्यार्थी आळंदीमध्ये कीर्तनकार होण्यासाठी व धार्मिक शिक्षण घेण्यासाठी येतात परंतु आर्थिक परिस्थितीमुळे वारकरी विद्यार्थ्यांवरती उपाशी राहण्याची वेळ येऊ नये, यासाठीही अन्नछत्र सुरू करणार आहे असे यावेळी बाबा कांबळे म्हणाले,

समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा आळंदी देवाच्या वतीने आळंदी येथे विशेष सर्वसाधारण सभा व कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक म्हणून निवडून आल्याबद्दल नानासाहेब आबनावे व धर्म शाळेतील सभा मंडप पत्रा शेड कामकाज पूर्ण करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरवठा केल्याबद्दलयांचा श्रीरंगदादा आबनावे यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बाबा कांबळे उपस्थित होते यावेळी आपले अध्यक्ष भाषणात  यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी संत रोहिदास विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, ग्राहक संरक्षण समितीचे माजी अध्यक्ष सूर्यकांत गवळी हवेली पंचायत समितीचे माजी सभापती किसनराव गाडेकर, दलित मित्र सुदाम लोखंडे, राष्ट्रीय स्वाभिमानी चर्मकार संघाचे अध्यक्ष सुरेश पोटे, दिंडी नंबर 24 चे अध्यक्ष सुरेश सोनवणे, घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक उत्तम सोनवणे, धर्मशाळेचे वरिष्ठ उपाध्याध श्रीरंगदादा अबणावे, दिल्ली नंबर 24 चे विनय करी ह भ प रामकृष्ण खाडे महाराज,जयदेव ईश्वर, विकास वाघमारे, व्यासपीठावरती उपस्थित होते,

सूर्यकांत गवळी म्हणाले समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा ही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराच्या अगदी समोर आहे. धर्मशाळेचा विकास व्हावा यासाठी आपण प्रयत्न करूया, यासाठी समाजातील एकोपा महत्त्वाचा आहे सर्वांनी एकजुटीने काम केल्यास हे शक्य आहे,

श्रीरंगदादा आबनावे म्हणाले मी गेल्या पंधरा वर्षापासून या संस्थेचा अध्यक्ष आहे या काळात आम्ही खूप काम केले लाखो रुपये एफडी स्वरूपात बँकेत ठेवल्या इमारतीचे काम केले वारकऱ्यांची सेवा केली आता नवीन तरुणांकडे सूत्र देत असून बाबासाहेब कांबळे हे अध्यक्ष  झालेले  आहेत ते धर्मशाळेचा चांगल्या पद्धतीने विकास करतील असे आम्हाला अपेक्षा आहे यामुळे  त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे,

यावेळी समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा वरती नियुक्त झालेल्या नवनिर्वाचित विश्वस्त  पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला यामध्ये, अध्यक्ष बाबासाहेब कांबळे, कार्याध्यक्ष नानासाहेब आबनावे, उपाध्यक्ष श्रीरंगदादा आबनावे,सुरेश गाडेकर, तुषार नेटके, डॉ किसन कांबळे,सचिव अनिल सातपुते, खजिनदार बबनराव पटेकर, सहखजिनदार सोपान गवळी, सुरेश सोनवणे श्रीभाऊ काळे, सुखदेव सूर्यवंशी, नंदकुमार सोनवणे,संतोष पाचारणे, सुखदेव आबनावे, सुभाष जाधव, दत्तात्रय शिंदे, मनोहर सोनटक्के, भारती चव्हाण, सोनाली देशमुख खरात, अनुपमा नेटके, मधुरा डांगे, आदींचा यावेळी शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला,

कार्यक्रमाच्या संयोजनासाठी, धर्मशाळेचे पुजारी नारायण गाडेकर, गणेश नेटके, विश्वनाथ नेटके, दीपक कांबळे, सूर्यकांत भोसले, बाबासाहेब हनवते, दत्तात्रय खाडे, यांनी  परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव अनिल सातपुते यांनी केले, आभार खजिनदार बबन पटेकर यांनी मानले, प्रस्तावना सुरश सोनवणे यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button