breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिकेची १२० वाहने भंगारात; स्थायी समितीत मंजुरी!

प्रशासकीय राजवटीमध्ये वाहतूक विभागाचे सक्षमीकरण: आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांचा निर्णय

पिंपरी । प्रतिनिधी  

महापालिकेच्या सेवेत असलेली जुनी निकामी झालेली १२० वाहने विक्री करण्यास व त्यातून येणारी रक्कम महानगरपालिका कोषागारात भरून घेण्यास मान्यता देण्यात आली.

महापालिका प्रशासक  शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या महापालिका स्थायी समिती सभेत विविध विषयांना प्रशासक  शेखर सिंह यांनी मान्यता दिली. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये संपन्न झालेल्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

मनपाचे स्थापत्य प्रकल्प  विभागाकडील कामाच्या तरतुदीमध्ये  वाढ करण्यास मान्यता देणेत आली. मनपाचे ब प्रभागामध्ये क्रीडा विषयक सुविधांची स्थापत्य विषयक कामे करण्यास  मान्यता देण्यात आली.

इ – प्रभागामध्ये क्रीडा विषयक सुविधांची स्थापत्य विषयक कामे करण्यास मान्यता देणेत आली. सन २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षाकरिता एकत्रित मानधनावर  शिक्षक नेमणुकीस मान्यता देणेत आली.

 महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागांतर्गत पशुवैद्यकीय दवाखाने व प्राणिसंग्रालय पशुवैद्यक, क्यूरेटर व  पशुवैद्यकीय  अधिकारी या अभिनामाचे पदावर दरमहा एकत्रित मानधनावर हंगामी (तात्पुरत्या ) स्वरुपात ३ महिने कालावधीसाठी मुदतवाढ देऊन नियुक्ती तथा  मानधनासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

यांत्रिकी साफसफाईसाठी सल्लागार नियुक्ती…

पिंपरी चिंचवड शहरातील १८ मी. व त्यावरील रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई  करणे कामासाठी तांत्रीक सल्लागार समिती गठीत करण्यास मान्यता देणेत आली. पिं.चिं.म.न.पा च्या चिखली येथे नव्याने होणाऱ्या टाऊन हॉलकरीता उच्चदाब वीजपुरवठा घेणेकामी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड यांना अनामत रक्कम, करारनामा व वीजपर्यवेक्षक शुल्क अदा करण्यास मान्यता देण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button