breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमुंबईराजकारणराष्ट्रिय

FIFA विश्वचषक खेळण्यासाठी पाहा खेळाडू किती पैसे घेतात

कतार । महाईन्यूज। वृत्तसंस्था ।

फिफा विश्वचषक २०२२ चे आयोजन 20 नोव्हेंबर रोजी कतारमध्ये केले जाईल. तर अंतिम सामना १८ डिसेंबरला होणार आहे. विश्वचषक स्पर्धेत एकूण ३२ संघ सहभागी होत आहेत. त्यात आशियातील ६ संघ आहेत, मात्र त्यात भारताचे नाव नाही. असे असूनही, भारतातही लाखो फुटबॉल चाहते आहेत, जे याला पूर्ण पाठिंबा देतात. भारतात क्रिकेट हा खेळ एखाद्या धर्मासारखा मानला जातो. इथे क्रिकेटची क्रेझ लोकांमध्ये वेगळ्याच पातळीवर पाहायला मिळते. पण लिओनेल मेस्सी, क्रिस्टियानो रोनाल्डो आणि नेमार ज्युनियरसारख्या स्टार खेळाडूंचे वेड असणारे फुटबॉल चाहतेही भारतात आहेत.

FIFA आणि T20 वर्ल्ड कप मॅच फी
चाहत्यांच्या मनात हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे की, फिफा विश्वचषकात खेळण्यासाठी खेळाडूंना किती मॅच फी मिळते? ही मॅच फी आणि टी-२० विश्वचषक खेळणाऱ्या खेळाडूंच्या मॅच फीमध्ये काय फरक आहे? फिफा विश्वचषक आणि टी-२० विश्वचषकामध्ये खेळाडूंना जवळपास समान मॅच फी मिळते. यात फारसा फरक नाही.
फिफा विश्वचषकातील टॉप-५ संघांच्या खेळाडूंच्या मॅच फीची टी-२० विश्वचषकातील टॉप-५ संघांच्या खेळाडूंच्या मॅच फीशी तुलना केली, तर फारसा फरक दिसत नाही. प्रत्येक संघ त्यांच्या करारानुसार ही मॅच फी स्वतंत्रपणे मिळते. क्रिकेट आणि फुटबॉलमध्ये हेच धोरण आहे.

फिफा विश्वचषकातील टॉप-५ संघांच्या खेळाडूंची मॅच फी
ब्राझील – सुमारे ४.८५ लाख रुपये
जर्मनी – सुमारे २.६५ लाख रुपये
फ्रान्स – सुमारे ३.३१ लाख रुपये
इंग्लंड – सुमारे २.४८ लाख रुपये
स्पेन – सुमारे २.९० लाख रुपये

टी-२० विश्वचषकातील टॉप-५ संघातील खेळाडूंची मॅच फी
भारतीय संघ – ३ लाख रु
ऑस्ट्रेलियन संघ – ४.४४ लाख रुपये
इंग्लंड संघ – ५.१ लाख रुपये
न्यूझीलंड संघ – २ लाख रु
पाकिस्तान संघ – १.३८ हजार रुपये

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button