breaking-newsपिंपरी / चिंचवड

महागाईच्या विरोधात भाजप कार्यालयासमोर युवक काँग्रेसचे मुक आंदोलन

पिंपरी – केंद्र शासनाच्या फसव्या घोषणांच्या विरोधात युवक काँग्रेसच्या वतीने शहर भाजप कार्यालयासमोर मूक आंदोलन करण्यात आले.

कोरोनाच्या महामारीच्या काळात रोजगार हिरावले गेले. जनता प्रचंड आर्थिक तणावात असताना केंद्र सरकारने आश्वासनांची खैरात केली. उद्योजक व नागरिकांना सुमारे 20 लाख कोटी पॅकेजची घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात नागरिकांची फसवणूक झाली आहे. या विरोधात आंदोलन करण्याचा निर्धार युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केला. आज चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने पिंपरी मोरवाडी येथील पिंपरी चिंचवड शहर भाजपा मध्यवर्ती कार्यलायसमोर शांत पद्धतीने मूक निदर्शने करून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.

या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस मयुर जयस्वाल, सेवादल अध्यक्ष मकरधवज यादव, शहर युवक काँग्रेसचे विशाल कसबे, कुंदन कसबे, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदेश बोर्डे, तुषार पाटील उपस्थित होते.

कोरोना महामारीच्या काळात निर्माण झालेल्या संकटाचा सामना करण्यासाठी केंद्राकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख करोडचे पॅकेज जाहीर केले होते. अद्याप या घोषणेची अंमलबजावणी केंद्र सरकारकडून न झाल्याने शेतकरी, महिला, उद्योजक, युवक सर्वच नागरिकांना अनेक समस्यांचा समाना करावा लागत आहे. केंद्र सरकारचा निषेध म्हणून आज राज्यभरात महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या वतीने राज्य भरात आंदोलन करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button